शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

Lok Sabha Election 2019; राजस्थानच्या काँग्रेसवर नागपूरकरांचा ‘वॉच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 09:52 IST

लोकसभेच्या निवडणुकीतही राजस्थानातील अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पांडे यांनी नागपूरसह विदर्भातील विश्वासू नेते- कार्यकर्त्यांची कुमक बोलावून घेतली आहे.

ठळक मुद्देडझनभर नेत्यांवर ‘ऑब्झर्व्हर’ची जबाबदारी‘ग्राऊंड रिपोर्ट’ मिळण्यासाठी अविनाश पांडे यांची रणनीती

कमलेश वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता झाली. या राज्याचे प्रभारी असलेले अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांना त्यामुळे अधिकच बळ मिळाले. आता लोकसभेच्या निवडणुकीतही राजस्थानातील अंतर्गत हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पांडे यांनी नागपूरसह विदर्भातील विश्वासू नेते- कार्यकर्त्यांची कुमक बोलावून घेतली आहे. सुमारे डझनभर नेत्यांना विविध लोकसभा मतदारसंघात ‘ऑब्झर्व्हर’ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या यंत्रणेच्या माध्यमातून पांडे यांना खरा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ मिळण्यास मदत होत असून त्या आधारावर ‘डॅमेज कंट्रोल’ची रणनीती आखण्यासही मदत होत आहे.विदर्भातील सात मतदारसंघात पहिल्या टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी मतदान झाले. यानंतर लगेच अविनाश पांडे यांनी त्यांच्या विश्वातील नेत्यांची यादी तयार करून त्यांच्यावर राजस्थानची जबाबदारी सोपविली. माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, माजी खासदार गेव्ह आवारी, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, प्रकाश वसू, नरेंद्र जिचकार, रवींद्र दरेकर, शकुर नागानी, ईश्वर चौधरी, विजय बाहेकर, मधुकर लिचडे, के.के. पांडे, झिया पटेल, कमलेश समर्थ, बंटी शेळके, दीपक पटेल, प्रताप ताटे, मुजीब पठाण, कमलेश चौधरी या सर्वांना एक-एका लोकसभा मतदारसंघाचे ‘ऑब्झर्व्हर’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यातील बहुतांश नेते गेल्या आठवड्यातच राजस्थानमध्ये दाखल झाले व त्यांनी जबाबदारी सोपविण्यात आलेल्या मतदारसंघात दौरेही सुरू केले आहेत तर काही नेते या आठवड्यात जाणार आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचाही नागपूर व विदर्भातील नेत्यांशी जवळचा संबंध राहिला आहे. गहलोत हे संघटन महासचिव असताना नागपूरकर नेत्यांनी दिल्लीवारी करीत बरेचदा त्यांची भेट घेतली होती. राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत नागपूरकर नेत्यांनी ‘ऑब्झर्व्हर’ म्हणून सोपविलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. त्यावेळी नागपूकरांनी गावोगाव फिरून खरा ‘ग्राऊंड रिपोर्ट’ पक्षाला सादर केला. त्याचा बराच फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे गहलोतही नागपूरकरांवर खूश आहेत. यावेळी लोकसभेसाठी बहुतांश मतदारसंघांवर नागपूरचे ‘ऑब्झर्व्हर’ नेमण्यात आले आहेत व यामुळे गहलोत देखील समाधानी असल्याचे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

राजस्थानच्या नेत्यांशीच नव्हे तर थेट मतदारांशीही चर्चाराजस्थानमध्ये ‘ऑब्झर्व्हर’ म्हणून नेमण्यात आलेले नागपूरकर नेत्यांवर संबंधित लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांशी समन्वय साधणे, निवडणूक तयारीचा आढावा घेणे आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. मात्र, अविनाश पांडे यांना मतदारसंघातील खºया परिस्थितीचा अहवाल देण्यासाठी ही नेते मंडळी मतदारसंघात फिरून थेट सामान्य मतदारांशीही संपर्क साधत आहेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेत काँग्रेस उमेदवाराच्या उणिवा कोणत्या, प्रचारातील उणिवा कोणत्या, त्याची भरपाई करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करायला हवी याची इत्थंभूत माहिती घेत आहेत व याचा गुप्त अहवाल अविनाश पांडे यांच्याकडे सादर केला जात आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRajasthanराजस्थान