शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे तंत्रज्ञान जाणार युरोपमध्ये; निर्मिती रोबोटिक्सशी शुकोचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:25 IST

आजवर आपण विदेशी कंपन्यांशी करार करत होतो ते तंत्रज्ञान आयात करण्यासाठी. पण आता चक्क शुको नावाच्या जर्मन उद्योगाने नागपूरच्या निर्मिती रोबोटिक्सशी करार केला असून, आता नागपूरचे तंत्रज्ञान युरोपमध्ये वापरले जाणार आहे.

ठळक मुद्देव्हीआयएचे सहकार्य

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजवर आपण विदेशी कंपन्यांशी करार करत होतो ते तंत्रज्ञान आयात करण्यासाठी. पण आता चक्क शुको नावाच्या जर्मन उद्योगाने नागपूरच्या निर्मिती रोबोटिक्सशी करार केला असून, आता नागपूरचे तंत्रज्ञान युरोपमध्ये वापरले जाणार आहे. विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशन (व्हीआयए)च्या सहकार्याने हा करार झाला हाहे.निर्मिती रोबोटिक्सची स्थापना २०१६ मध्ये झाली असून, विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन अल्पावधीत लोकप्रिय करणारे यशस्वी उद्योजक बंधू कार्तिक/सुदर्शन व मनीष शेंडे यांच्या कल्पनेतून ही कंपनी साकार झाली आहे. या तंत्रज्ञानाचे जनक जय मोटघरे, राजेश आदमने, कार्तिक शेंडे हे संचालक तर सुदर्शन शेंडे हे व्यवस्थापकीय संचालक आहेत.निर्मिती रोबोटिक्सजवळ ओझोन स्टरलायझेशन हे पेटंट केलेले तंत्रज्ञान असून, त्याचा उपयोग इमारतीमधील एअर कंडिशनिंग डक्ट आतून नुसते स्वच्छ करण्यासाठी नव्हे तर निर्जंतूक करण्यासाठी केला जातो. जगातले डक्ट निर्जंतूक करणारे हे एकमेव तंत्रज्ञान आहे, अशी माहिती सुदर्शन शेंडे व जय मोटघरे यांनी दिली.एअरकंडिशनिंग डक्ट सहसा स्वच्छ केले जात नाहीत. त्यामुळे आतमध्ये नुसती धूळच नव्हे तर मानवी आरोग्याला अपायकारक विषारी जीवाणूही तयार होतात. ओझोन स्टरलायझेशनमध्ये डक्टमधील रोबोटच्याद्वारे केवळ बाहेर काढली जात नाही तर डक्ट आतून निर्जंतूक केले जाते, असे जय मोटघरेंनी सांगितले.निर्मिती रोबोटिक्सने या तंत्रज्ञानाचा उपयोग महानिर्मितीची ऊर्जा केंद्रे, भारतीय रेल्वेचे मुंबईमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, सेंट्रल रेल्वेचे डेटा सेंटर व मुख्य रिझर्व्हेशन हॉल, ट्रेन मॅनेजमेंट सिस्टिम हॉल येथे केले आहे. आम्ही केवळ रोबोट बनवत नाही तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीअंतर्गत आठ कर्णबधिर मुलांना आम्ही रोजगारही दिला आहे. आमची कंपनी स्टार्ट-अप पंजीबद्ध आहे व आम्ही मेक-इन इंडिया शिवाय स्वच्छ भारत अभियानातही योगदान देतो, हे सुदर्शन शेंडे यांनी अभिमानाने नमूद केले. लवकरच सुदर्शन शेंडे व जय मोटघरे हे जर्मनीला भेट देणार असून, तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून कराराला मूर्तरूप देतील. शुको समूहाने निर्मितीच्या रोबोसह तंत्रज्ञान व सेवा असे तिन्ही प्रकार वापरण्याची तयारी दर्शविली आहे, असे मोटघरे यांंनी सांगितले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान