शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ठगबाज पिंपळेने हडपले १० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 20:32 IST

केमिकल फॅक्टरीचे लायसन्स मिळवून देण्याची थाप मारून एका कथित नेत्याने एका दाम्पत्याचे १० लाख रुपये हडपले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. उमेश मारोतराव पिंपळे असे आरोपीचे नाव असून तो गोकुळपेठ मार्केट जवळ राहतो.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केमिकल फॅक्टरीचे लायसन्स मिळवून देण्याची थाप मारून एका कथित नेत्याने एका दाम्पत्याचे १० लाख रुपये हडपले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. उमेश मारोतराव पिंपळे असे आरोपीचे नाव असून तो गोकुळपेठ मार्केट जवळ राहतो. फिर्यादी लीना दिगंबर नारनवरे ( वय ४२) या खामल्यातील मिलिंद नगरात राहतात. त्या आणि त्यांचे पती दिगंबर लक्ष्मणराव नारनवरे यांच्यासोबत आरोपी उमेश पिंपळेची जुनी ओळख आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नारनवरे दाम्पत्य स्वच्छतेसाठी घरगुती वापरात येणारे फिनाईलसारखे केमिकल बनवितात. आरोपी पिंपळे याने नारनवरे दाम्पत्याला विश्वासात घेतले आणि त्यांना केमिकल्स बनविण्याचा परवाना मिळवून देण्याची बतावणी केली. त्यासाठी थोडासा खर्च करावा लागेल, असे सांगून आरोपीने नारनवरे दाम्पत्याला जाळ्यात ओढल्यानंतर १ जानेवारीपासून ३० जून २०१९ पर्यंत वेगवेगळ्या वेळी एकूण १० लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तीचे नाव सांगून त्यांना पैसे द्यावे लागतात, असे आरोपी पिंपळे म्हणायचा.घर गहाण ठेवून दिले पैसेकेमिकल बनविण्याचे लायसन्स मिळाल्यास आपली आर्थिक प्रगती होईल, या आशेपोटी नारनवरे दाम्पत्याने प्रारंभी कर्ज काढले. नंतर स्वत:चे घर गहाण ठेवून आरोपीला रक्कम दिली. मात्र एवढी मोठी रक्कम घेऊनही आरोपींनी त्यांना कसल्याही प्रकारचे लायसन्स बनवून दिले नाही. या, त्या कार्यालयात नेऊन आरोपी पिंपळे नारनवरे दाम्पत्यांना त्यांच्या कामासाठी धावपळ करीत असल्याचा बनाव करीत होता. त्याची बनवेगिरी लक्षात आल्यानंतर नारनवरे यांनी त्याला आपली रक्कम परत मागितली. त्यानंतर पिंपळेने प्रतिसाद देणे बंद केले.धनादेशही वटले नाहीपिंपळे आपले काम करून देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे नारनवरे दाम्पत्याने आपली रक्कम मागण्यासाठी त्याच्या मागे तगादा लावला. पिंपळेने नारनवरे दाम्पत्याला ६.५० लाख रुपयाचे वेगवेगळे धनादेश दिले. मात्र त्यातील एकही धनादेश वटला नाही. तो रक्कम देणार नाही, त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे नारनवरे दाम्पत्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर सोमवारी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांची भेट घेतली. तक्रार आणि पुरावे तपासल्यानंतर उपायुक्त मासाळ यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपी उमेश पिंपळेविरुद्ध भादवि कलम ४२०,४०६ अन्वये गुन्हा नोंदविला. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक झाली नव्हती.अनेकांना गंडापिंपळे यांनी अशाच प्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची माहिती आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही प्रतापनगर ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याचे सांगितले जाते. त्याची स्वत:ची केरोसीनची एजन्सी असल्याचे पोलीस सांगतात. अशाच प्रकारची एजन्सी मिळवून देतो, असे सांगून तो सावज जाळ्यात ओढतो आणि त्यांची लाखोने फसवणूक करतो, अशी चर्चा आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी