शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आरटीओ कार्यालयांचे उत्पन्न घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 10:39 IST

मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यास राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयांच्या वायू पथकाला अपयश आले आहे.

ठळक मुद्देवायू पथकांची ६६ टक्केच उद्दिष्टपूर्ती केवळ दोनच पथकाचे यश

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील आर्थिक वर्षात महसूल वसुलीचे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण करण्यास राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयांच्या वायू पथकाला अपयश आले आहे. केवळ दोनच आरटीओ कार्यालयाच्या पथकाला आपले लक्ष्य पूर्ण करता आले. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यालये मिळून वायू पथकाला महसूल वसुलीचे ५००८६.३९ लाखांचे लक्ष्य देण्यात आले होते. परंतु पथकाला ६६ टक्के म्हणजे ३३१२७.१३ लाख महसूल गोळा करण्यात यश आले. वायू पथकांच्या अपयशामुळे कार्यालयांचे उत्पन्न घटले आहे.आरटीओ कार्यालयांमध्ये सोर्इंचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता आहे. मात्र त्याकडे डोळेझाक करत राज्याकडून महसुलाचे लक्ष्य न विसरता वाढवून दिले जाते. नुकतेच सरलेले आर्थिक वर्षदेखील त्याला अपवाद नव्हते. विशेष म्हणजे, वायुवेग पथकाचा आधुनिकीकरणाचा अभाव, हे या मागील एक कारण असल्याचे, या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यानुसार शासनाने वायू पथकाला आवश्यक त्या प्रमाणात वाहने उपलब्ध करून दिली नाहीत. यातच शासनाने मालवाहू वाहनाची भार क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला. यामुळे ‘ओव्हरलोड’ वाहने ‘अंडरलोड’ झाली. दोन टनापासून १० टनापर्यंत त्यांची क्षमता वाढली. यामुळे येथून मिळणारा महसूल कमी झाला. सीमा तपासणी नाक्यावर ‘स्टॅण्डर्ड आॅपरेटिंग सिस्टम’ला (एसओपी) सुरुवात झाली. या प्रणालीअंतर्गत १०० टक्के वाहने तपासू नका, असे आदेश आले. या सर्वांचा परिणाम वायू पथकाना उद्दिष्ट पूर्ण करण्यावर झाला. यामुळे राज्यातील ४६ आरटीओ कार्यालयातील वायू पथकाला आपले लक्ष्यच गाठता आले नाही. केवळ पिंपरी चिचवड आरटीओ कार्यालयाच्या पथकाला १०८ टक्के तर अहमदनगर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला १४३ टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले.पाच कार्यालयांचे वायू पथक ५० टक्क्यांपर्यंतही पोहचले नाहीराज्यातील मुंबई सेंटर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ३६ टक्के, कोल्हापूर आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४० टक्के, सातारा आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४९ टक्के, धुळे आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ३० टक्के तर हिंगोली आरटीओ कार्यालयाच्या पथकाला ४५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करता आले. या पाच कार्यालयांच्या वायू पथकाला ५० टक्के लक्ष्यही पूर्ण करता आले नाही.विदर्भातील कार्यालयांच्या पथकांनी गाठली सत्तरीविदर्भातील अमरावती कार्यालयाच्या पथकाने ७३ टक्के, बुलडाणा कार्यालयाच्या पथकाने ८३ टक्के, यवतमाळ कार्यालयाच्या पथकाने ६५ टक्के, अकोला कार्यालयाच्या पथकाने सर्वाधिक म्हणजे ९६ टक्के, वाशीम कार्यालयाच्या पथकाने ७४ टक्के, नागपूर शहर कार्यालयाच्या पथकाने ७६ टक्के, वर्धा कार्यालयाच्या पथकाने ७५ टक्के, नागपूर ग्रामीण कार्यालयाच्या पथकाने ७१ टक्के, गडचिरोली कार्यालयाच्या पथकाने ५९ टक्के, चंद्रपूर कार्यालयाच्या पथकाने ७५ टक्के, गोंदिया कार्यालयाच्या पथकाने ८५ टक्के तर भंडारा कार्यालयाच्या पथकाने ७३ टक्के लक्ष्य गाठले. विशेष म्हणजे, दोन वर्षांपूर्वी यातील बहुसंख्य आरटीओ कार्यालयांच्या पथकाने १०० टक्क्यांवर महसूल गोळा केला होता.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस