शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूरचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 00:42 IST

देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.

ठळक मुद्देधूलिकणांचे प्रमाण विक्रमी घटले : व्हीएनआयटीचा अभ्यास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील १०२ सर्वाधिक प्रदूषित शहरामध्ये राज्याच्या १०-१२ शहरात नागपूरचाही क्रमांक लागतो. या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे पार्टीकुलेट मॅटर म्हणजे धुलिकण होय. मात्र लॉकडाऊनच्या काळात याचे प्रमाण विक्रमी घटले असून एकूणच प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकावर पोहचले आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या निर्देशानुसार विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (व्हीएनआयटी) द्वारे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण केले जात आहे. व्हीएनआयटीने लॉकडाऊनच्या काळात एप्रिल महिन्यात शहरातील चार स्थानावरून प्रदूषणाचे परीक्षण केले आहे. यात प्रामुख्याने धूलिकण (पीएम-१०) तसेच सल्फर डायऑक्साईड (एसओ2), नायट्रोजन डायऑक्साईड (एनओ2) यांच्या प्रदूषणाचा अभ्यास केला आहे. अभ्यास केलेल्या चार ठिकाणांमध्ये एमपीसीबीचे सिव्हील लाईन्स येथील कार्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिआर्स उत्तर अंबाझरी मार्ग, एमआयडीसी हिंगणा रोड आणि शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज सदर यांचा समावेश आहे.व्हीएनआयटीच्या २०१० पासूनच्या अभ्यासानुसार एसओ2 व एनओ2 चे प्रमाण कधीही प्रदूषण मर्यादेच्या बाहेर गेले नाही. शिवाय सिव्हील लाईन्समध्ये धुलिकणांचे प्रमाणही मर्यादेबाहेर गेले नाही. १०० मायक्रोग्रॅम ही सर्वोच्च मर्यादा आहे आणि ६० मायक्रोग्रॅम (म्युग्रॅ)हे आदर्श प्रमाण. मात्र तिन्ही ठिकाणी याचे प्रमाण २०१० पासून एप्रिल महिन्यात कायम मर्यादेच्या बाहेर गेले आहे. २०१५ मध्ये धुलिकणांचे प्रमाण सदर व सीताबर्डी येथे १४० म्युग्रॅ तर एमआयडीसी येथे १८० म्युग्रॅम पर्यंत वाढले होते. इतर वर्षी ते १०० च्या आसपास राहिले आहे. मात्र यावेळी हेच प्रमाण ६० ते ६५ म्युग्रॅम पर्यंत खाली घसरले आहे. ४० ते ६० वर राहणाऱ्या एसओ2 व १० ते २० दरम्यान राहणाऱ्या एनओ2 ने ८० म्युग्रॅमची मर्यादा कधी ओलांडली नाही.मोठ्या प्रमाणात चालणारे उद्योग, बांधकाम कार्य, कचरा जाळणे आणि काही प्रमाणात वाहनांमुळे धुलिकणांचे प्रदूषण अधिक असते. लॉकडाऊन काळात उद्योग व बांधकाम बंद आहेत व कचरा जाळणे दिसून येत नाही. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे पुढचे अनेक वर्षे याचा फायदा होणार आहे.- डॉ. दिलीप लटाये, सिव्हील इंजिनिरिंग विभाग, व्हीएनआयटी

टॅग्स :pollutionप्रदूषणenvironmentपर्यावरणnagpurनागपूर