शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

नागपूरचे नवीन महापौर सोमवारी ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 22:32 IST

नागपूर शहराचा नवीन महापौर कोण राहणार याचा उलगडा सोमवारी होणार आहे. कारण सोमवारी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला करावयाचा आहे.

ठळक मुद्देजोशी-तिवारी यांच्या नावांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराचा नवीन महापौर कोण राहणार याचा उलगडा सोमवारी होणार आहे. कारण सोमवारी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला करावयाचा आहे. महापालिकेतील संख्याबळाचा विचार करता भाजपला आव्हान मिळण्याची शक्यता नाही. पण संख्याबळ नसूनही काँग्रेसतर्फे महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपची सत्ता नसल्याने महापालिकेला भविष्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. याचा विचार करता अनुभवी व महापालिका नियम व कायद्याचे ज्ञान असलेल्या व्यक्तीची या पदावर निवड होण्याची शक्यता आहे.महापौर पदासाठी सत्तापक्ष नेता संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी व चेतना टांक आदींच्या नावाची चर्चा आहे. भाजपातील काही असंतुष्ट नेत्यांकडून महापौर पदासाठी संजय बंगाले, वर्षा ठाकरे आदींचे नावे पुढे केली जात आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. उपमहापौर पदासाठी भाजप नगरसेवक फारसे इच्छूक दिसत नव्हते. त्यामुळे भाजप बाहेरील नगरसेवकाला हे पद देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होताच उपमहापौर पदासाठी पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे. महापौरपद पुरूष नगरसेवकाला दिल्यास उपमहापौरपदी महिला नगरसेवकांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.महापालिकेतील विरोधीपक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात शनिवारी काँग्रेस नगरसेवकांची बैठक झाली. यात महापौर व उपमहापौर पदासाठी काँग्रेस उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीला काँग्रेसचे मोजकेच नगरसेवक उपस्थित होते. पक्षातील गटबाजी अजूनही कायम आहे.सव्वादोन वर्षानंतर महापालिकेची निवडणूक आहे. याचा विचार करता महापौरपदी सक्षम व्यक्तीची गरज आहे. भाजपचे जगदीश ग्वालबंशी यांचे निधन झाले आहे. तर दूर्गा हाथीठेले अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे महापालिका सभागृहात १५१ जागापैकी १४९ नगरसेवक आहेत. यात भाजपचे १०६ नगरसेवक आहेत. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत महापौर व उपमहापौर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानुसार रविवारी नाव निश्चित होण्याची शक्यता आहे.२२ नोव्हेंबरला निवडणूकमहापौर व उपमहापौर पदासाठी सोमवारी इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र सादर करतील. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाईल. शुक्रवारी २२ नोव्हेंबरला महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. २१ नोव्हेंबरला महापौर नंदा जिचकार यांचा कार्यकाळ संपत आहे. नवीन महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ अडीच वर्षासाठी राहील. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMayorमहापौरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका