शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

नागपूरच्या नंदनवन पोलिसांनीच मारला २.५५ कोटींवर हात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:50 IST

नंदनवन पोलिसांनी हवालाच्या कारमधून २ कोटी ५५ लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. सातारा पोलिसांनी यात पोलिसांना मदत करणाऱ्या चार आरोपींना महाबळेश्वरमध्ये अटक केली आहे. आरोपींकडून लुटीच्या रकमेतील २ लाख ८२ हजार रुपये आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलीसांच्या मदतीने ही लूट केल्याची बाब आरोपींनी कबूल केली आहे. या कबुलीनाम्यामुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांविरुद्ध कोणत्याही क्षणी लुटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देसातारा पोलिसांनी चौघांना पकडताच बिंग फुटले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नंदनवन पोलिसांनी हवालाच्या कारमधून २ कोटी ५५ लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. सातारा पोलिसांनी यात पोलिसांना मदत करणाऱ्या चार आरोपींना महाबळेश्वरमध्ये अटक केली आहे. आरोपींकडून लुटीच्या रकमेतील २ लाख ८२ हजार रुपये आणि वाहन जप्त करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे पोलीसांच्या मदतीने ही लूट केल्याची बाब आरोपींनी कबूल केली आहे. या कबुलीनाम्यामुळे शहर पोलिसात खळबळ उडाली आहे. प्रकरणात सहभागी असलेल्या पोलिसांविरुद्ध कोणत्याही क्षणी लुटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.नंदनवन पोलिसांनी २६ एप्रिलला रात्री प्रजापती चौकात डस्टर क्रमांक एम. एच. ३१/ एफ. ए. ४६११ मध्ये ३ कोटी १८ लाख रुपये जप्त केले होते. ही रक्कम रायपूरवरून नागपूरला आणण्यात येत होती. या कारवाईनंतर सिव्हील लाईन्सच्या मनीष खंडेलवाल नावाच्या युवकाने डस्टरमधून २.५५ कोटी रुपये लंपास केल्याचा आरोप लावला होता. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली होती. खंडेलवालने २८ एप्रिलला रायपूरच्या मॅपल ज्वेलर्सच्या अली जीवानी नावाच्या व्यक्तीने रक्कम पळविल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. या कारवाईत नंदनवन ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील सोनवणे, उपनिरीक्षक कृष्णा सोनुले, शिपाई सचिन भजभुजे यांनी कारवाई केली होती. कारवाई दरम्यान पोलिसांसोबत आरोपी सचिन पडगिलवार आणि रवी माचेवारही हजर होते. प्रजापतीनगरात डस्टरला थांबविल्यानंतर पोलिसांनी त्यातील नवनीत जैन आणि राजेश मेंढे यांना आपल्या वाहनात बसविले. पोलीस आरोपींसोबत डस्टरमध्ये बसून अज्ञात स्थळी रवाना झाले होते. याच दरम्यान रक्कम गायब झाली होती. नंदनवन पोलीस आणि गुन्हे शाखा या घटनेनंतर सचिन आणि रवीचा शोध घेत होते. पोलिसांना ते आर्टिगा क्रमांक एम. एच. ४९, यु-०७५४ ने गोव्याला गेल्याचे समजले. झोन ४ चे उपायुक्त नीलेश भरणे यांनी साताराचे अधीक्षक संदीप पाटील यांना वाहनाची माहिती देऊन आरोपींना अटक करण्याची विनंती केली. मंगळवारी रात्री रवी आणि सचिन आपला साथीदार पिंटु वासनिक आणि गजानन मुनमुने याच्या सोबत महाबळेश्वरच्या एका हॉटेलमध्ये सापडले.त्यांच्या जवळ लुटीचे २.८२ लाख रुपये जप्त करण्यात आले. सातारा पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांना गुन्हे शाखा पोलिसांना सोपविले. पोलीस रात्री उशिरा त्यांना घेऊन नागपुरात पोहोचले. आरोपींनी सांगितल्यानंतर कुणालाही नवल वाटेल. सूत्रांनुसार पोलीस सचिन पडगिलवार आणि रवी माचेवारसोबत डस्टर घेऊन हसनबाग चौकीत पोहोचले. तेथे स्कू्र ड्रायव्हरच्या मदतीने लॉकर उघडून पैसे काढले. ठरलेल्या योजनेनुसार नंदनवन ठाण्यातील एक अधिकारी तेथे पोहोचला. तो ही रक्कम घेऊन आपल्या बाईकने रवाना झाला. त्यानंतर पोलीस कर्मचारी डस्टर घेऊन नंदनवन ठाण्यात पोहोचले. त्यानंतर नवनीत आणि राजेशला त्यांच्या मालकाबाबत विचारणा करण्यात आली. सकाळी ७ वाजता मनीष खंडेलवाल ठाण्यात पोहोचल्यानंतर डस्टरमधुन ३ कोटी १८ लाख रुपये मिळाल्याची माहिती समजली. त्यानंतर २.५५ कोटी रुपये पळविल्याची चर्चा पसरली.या लुटीचा भंडाफोड झाल्यामुळे कारवाईत सामील अधिकारी, कर्मचाऱ्यात खळबळ उडाली. त्यांनी त्वरित सचिन आणि रवीसोबत संपर्क साधला. त्यांना काही दिवस फरार राहण्यास सांगितले. दोघेही पिंटु वासनिक आणि गजानन मुनमुने सोबत गोवा फिरण्यासाठी गेले. ते सोलापूर, कोल्हापूर या मार्गाने गोव्याला जाणार होते. दरम्यान पोलीस आपल्या शोधात गोव्याला पोहोचल्याचे त्यांना समजले. त्यामुळे गोव्याऐवजी ते महाबळेश्वरला पोहोचले. महाबळेश्वरला सातारा पोलिसांनी त्यांना पकडले. गुन्हे शाखेने आरोपींना नंदनवन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. नंदनवन पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.विमानाने रवाना झाले पोलिसांचे पथकझोन ४ चे उपायुक्त निलेश भरणे यांनी सुरुवातीपासूनच हे प्रकरण गंभीरतेने घेतले होते. तत्काळ गुन्हा दाखल करण्याच्याच ते पक्षात होते. त्यांनीच सातारा पोलीसांना आरोपींचे नेमके ‘लोकेशन’ सांगितले. नंदनवन पोलीस मंगळवारी रात्री विमानाने पुण्यालादेखील पोहोचले. त्याच्या अगोदरच सातारा पोलिसांनी आरोपींना गुन्हे शाखेच्या स्वाधीन केले होते.‘लोकमत’ने केला होता खुलासाया घटनेचा ‘लोकमत’ने पहिल्यांदा खुलासा केला होता. सचिन पडगिलवार आणि रवी माचेलवार यांचा या घटनेत हात असल्याचे सांगितले होते. लुटमारीची घटना घडविणाऱ्या  पोलिसांनी हवाला व्यापाऱ्यातर्फे दबाव टाकण्याचा खोटा आरोप लावण्याचा दावा केला होता. ‘लोकमत’ने पोलिसांनीच लुटमार केल्याची पुष्टी केली होती. नंदनवन पोलिसांनी ही कारवाई सचिन आणि रवीच्या इशाऱ्यावरच केली होती. दोघांनी लुटीची कबुली केल्यामुळे पोलिसांवर गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसRobberyदरोडा