शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पुरूषी खेळात वर्चस्व मिळविलेली नागपूरची ‘आयर्न वूमन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:31 PM

ट्रायथलॉन या खेळात पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहे व ‘आयर्न मॅन’ हाच किताब विजेत्याला दिला जातो. मात्र हे वर्चस्व मोडीत काढले नागपूरच्या सुनिता धोटे यांनी.

ठळक मुद्देसुनिता धोटेंनी जिंकले राष्ट्रीय ट्रायथलॉन एका दमात स्विमींग, सायकलिंग व रनिंगही

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : म्हणतात ना, जिद्द आणि परिश्रमाला कशाचीही तोड नाही. एका दमात २ किलोमीटर पोहल्यानंतर लगेच ९० किमीची सायकलिंग आणि पाठोपाठ २१ किमी धावण्याची हिंमतच कुणी करणार नाही. ही स्पर्धा म्हणजे ट्रायथलॉन. खरतर या खेळात पुरुषांचेच वर्चस्व राहिले आहे व ‘आयर्न मॅन’ हाच किताब विजेत्याला दिला जातो. मात्र हे वर्चस्व मोडीत काढले नागपूरच्या सुनिता धोटे यांनी. १० तासाचे हे आव्हान साडेनऊ तासात पूर्ण करणाऱ्या सुनिता यांना या राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजकांकडून ‘आयर्न वूमन’ हा किताब बहाल करण्यात आला. आणि हो, दोन मुलांच्या आई असलेल्या सुनिता या ४६ वर्षाच्या आहेत, हे विशेष.सुनिता धोटे या रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचा मोठा मुलगा अभियांत्रिकीला तर लहान पॉलिटेक्निकला आहे. वायुसैनिकाची मुलगी असल्याने आव्हाने स्वीकारण्याची मानसिकता रक्तातूनच मिळालेली. खेळाची आवड, नियमित सायकलिंग व रनिंगद्वारे त्यांनी फिटनेस सांभाळला आहे. ट्रायथलॉन या स्पर्धेबद्दल त्यांनी ऐकले होते व पुण्यातील एका महिलेने ती पूर्ण केल्याची माहिती त्यांनी होती. त्यामुळे हे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार फिटनेस गुरू डॉ. अमित समर्थ, डॉ. नीना शाहू व डॉ. शाहू यांचे मार्गदर्शन घेतले. यात त्यांचे पती नितीन धोटे यांचा भक्कम पाठिंबा त्यांना मिळाला.हैदराबाद येथे ११ नोव्हेंबरला ही स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी ट्रायथलॉन स्पर्धेत १०१ स्पर्धक सहभागी होते, ज्यामध्ये सुनिता यांच्यासह केवळ दोन महिला सहभागी होत्या. सकाळी ७.३० वाजता त्यांनी स्विमिंगला सुरुवात केली.दोन किमीचे हे अंतर १ तास ५ मिनिटात पूर्ण करून त्यांनी लगेच ९० किमीची सायकलिंग सुरू केली. त्यांच्या फिटनेसमुळे हे अंतरही त्यांनी ४.३० तासात पूर्ण केले. मात्र खरा कस लागला तो पुढच्या धावण्याच्या टास्कमध्ये. त्यांनी ताबडतोब धावणे सुरू केले.सूर्य डोक्यावर आला होता. शरीर उत्तर देऊ लागले होते. पायात आणि पोटात क्रॅम्प येऊ लागले होते. त्यांच्या सोबतची महिला केव्हाच स्पर्धा सोडून गेली होती.पुढे जावे की क्वीट करावे, हे विचारचक्र सुरू असताना मेंदू मात्र हार पत्करायला तयार नव्हता. काहीही करून हे अंतर पूर्ण करावे, या विचाराने शेवटचे अंतर स्वत:ला ओढतच नेल्याचे त्या सांगतात. अखेर ९.३० तासात त्यांनी तिन्ही आव्हान पूर्ण करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. रनिंगच्या फिनिश लाईनवर कोसळताना एक अलौकिक समाधान घेऊन त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. स्टॅमिना, परिश्रम, जिद्द, संयम आणि सातत्य राखत त्यांनी विदर्भातील पहिल्या ट्रायथलॉन विजेता होण्याचा मान पटकावला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक