शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

श्री गजाननाच्या जयजयकाराने नागपूर दुमदुमले; प्रकटदिनोत्सवाला उत्साही सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 10:11 IST

श्री संत गजानन महाराजांच्या १४० व्या प्रकटदिनोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

ठळक मुद्दे कुठे पालखी यात्रा तर कुठे भजन, कीर्तनाचे सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्री संत गजानन महाराजांच्या १४० व्या प्रकटदिनोत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. शहरातील विविध मंदिरांमध्ये सामाजिक, धार्मिक संस्था, संघटनांच्यावतीने अनेक प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक आयोजन यानिमित्त करण्यात आले. मंगळवारी काही मंदिरामधून श्रींच्या पालखीसह मिरवणुकाही काढण्यात आल्या. भजन, कीर्तनाच्या रंगात रंगलेले गजानन भक्त आकर्षक पोशाखात दिंडीमध्ये सहभागी झाले होते. अनेक संस्थांच्यावतीने आठवडापूर्वीपासून उत्सवाला सुरुवात झाली असून पुढच्या आठवडाभर हे उत्सवाचे वातावरण राहणार आहे.

पालखी यात्रेने भारवला न्यू सुभेदार लेआऊटचा परिसरन्यू सुभेदार ले-आऊट स्थित गजानन प्रसाद येथे संत गजानन महाराजांच्या १४० वा प्रगटदिनोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंगळवारी यानिमित्त श्रींची भव्य पालखी काढण्यात आली. समोर पालखी व मागे श्रींची प्रतिमा असलेल्या सजलेल्या रथासह ही मिरवणूक निघाली. घोडे तसेच शिवाजी महाराज, झाशीची राणी व महापुरुषांच्या वेशभूषेत नटलेली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. पालखी यात्रेतील महावीर हनुमानाची वेशभूषा केलेले कलावंत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले होते. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या मुलींचे लेझिम पथक व भजन मंडळ व वारकरी भक्तांच्या टाळ मृदंगाच्या स्वरातील भजनांनी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले. संपूर्ण परिसरात पालखीचे भ्रमण करण्यात आले. मोठ्या संख्येने नागरिक व भक्तगण आकर्षक पोषाख परिधान करून पालखी यात्रेत सहभागी झाले होते. श्रींच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण परिसरातील रस्ते रांगोळीने सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी महिलांसह कुटुंबातील सदस्य पालखीतील श्रींचे पूजन करीत होते. गेल्या ३० वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. यावेळी न्यू सुभेदार परिसरातील चौकोनी मैदानात झालेला रिंगण सोहळा डोळ्यात भरणारा ठरला.

टॅग्स :Gajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर