शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरच सौर ऊर्जेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 13:08 IST

मेडिकल प्रशासनाने इमारतीच्या छतांवर सौरऊर्जेतून ‘सनब्लेस सोलर पार्क’ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे दर वर्षाला वाचणार पावणे तीन कोटी१६४८ किलोवॅट विजेची निर्मिती

:सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही वर्षांमध्ये, विजेचे दर कमालीचे वाढले आहेत. गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेडिकललाही वीजबिलाचे चटके सहन करावे लागत आहेत. यातच विजेची मागणी सातत्याने वाढत आहे. यावर पर्याय म्हणून मेडिकल प्रशासनाने इमारतीच्या छतांवर सौरऊर्जेतून ‘सनब्लेस सोलर पार्क’ची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे १६४८ किलोवॅट विजेची निर्मिती होणार असून विजेवर दरवर्षी खर्च होणारे मेडिकलचे २ कोटी ७५ लाख रुपये वाचणार आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली आहे.आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकलमध्ये नवनवीन विभागाची निर्मिती होऊ घातली आहे. ट्रॉमा केअर सेंटर, अतिदक्षता विभागाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून मुलांचा वसतिगृहाचे बांधकाम सुरू आहे. भविष्यात कॅन्सर हॉस्पिटल, सिकलसेल सेंटर, स्पाईन सेंटर व इतरही नवीन विभागाचे बांधकाम होणार आहे. यामुळे या विभागांना मोठ्या प्रमाणात वीज लागणार आहे. सध्याच्या स्थितीत मेडिकलच्या २०० एकर परिसराला प्रकाशमान करण्यासाठी प्रशासनाला दरमहा सुमारे ८० लाख रुपये वीजबिलावर खर्च करावे लागत आहेत. शासन दरवर्षी मेडिकलला विजेसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान देते. परंतु वाढते विभाग, वॉर्ड व यंत्रसामूग्रीमुळे खर्च आणि अनुदान यात मेळ बसणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. ते टाळण्यासाठी आणि खर्चातही बचत करण्यासाठी असा दुहेरी हेतू या सौर ऊजेतून साध्य करण्याचा मेडिकल प्रशासनाचा प्रयत्न आहे. २०१७ ला प्रकल्पाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यावेळी ‘महाराष्टÑ ऊर्जा विकास अभिकरण’कडून सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मेडिकलच्या इमारतीची पाहणी करण्यात आली होती. परंतु पुढे निधीअभावी हा प्रकल्प थंडबस्त्यात पडला. आता अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ५ जुलै रोजी पालकमंत्री बावनकुळे यांनी मेडिकलची बैठक घेतली असता डॉ. मित्रा यांनी सौरऊर्जा प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवला. ८ कोटींच्या या प्रकल्पाला बावनकुळे यांनी तात्काळ मंजुरी दिली.मेडिकल ते डेंटल कॉलेजच्या इमारतीवर सौर पॅनलसौरऊर्जेतून वीज निर्मिती करण्यासाठी मेडिकलचा अपघात विभाग, वॉर्ड क्र. १३, १२, २८, ३२, ३३, पूर्व भागातील संपूर्ण विंग, मार्ड वसतिगृह, डेंटल कॉलेज, मुलामुलींचे वसतिगृह, नर्सिंग होस्टेलच्यावर सौर पॅनल लावले जाणार आहे. साधारण १० हजार ३०० स्क्वेअर मीटरवर लावण्यात येणाºया या पॅनलमधून १६४८ किलोवॅट विजेची निर्मिती होणार आहे.सौरऊर्जेतून मेडिकलचा विकाससौरऊर्जा हा स्वच्छ अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत आहे. ऊर्जाबचत आणि विजेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा वरदान ठरत आहे. म्हणूनच, मेडिकलमध्येही सौरऊर्जा प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पातून मेडिकलचा विकास साधण्याचा प्रयत्न होणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला आहे.-डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय