शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरची डिजिटल झेप ! ७१ टक्के वीजबिले आता ऑनलाईन

By आनंद डेकाटे | Updated: April 9, 2026 18:12 IST

Nagpur : महावितरणला ३६४० कोटींचा महसूल; डिजिटल व्यवहारांतूनच २८२८ कोटींची भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटलायझेशनच्या युगात नागपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, महावितरणच्या महसूल संकलनात डिजिटल माध्यमांचा मोठा वाटा दिसून आला आहे. नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ आर्थिक वर्षात जिल्ह्यातील तब्बल ७१.०३ टक्के लघुदाब ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरले, तर एकूण महसुलापैकी ७७.२३ टक्के रक्कम डिजिटल माध्यमातून जमा झाली आहे.

महावितरणच्या आकडेवारीनुसार, वर्षभरात नागपूर जिल्ह्यात १ कोटी ५३ लाख ६३ हजार ३९० व्यवहारांमधून ३६४०.८६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. यापैकी १ कोटी ११ लाख ३९ हजार ११६ व्यवहार ऑनलाईन झाले असून, त्यातून २८२८.२३ कोटी रुपये तिजोरीत जमा झाले.

नागपूर शहर मंडळात ऑनलाईन बिल भरण्याचे प्रमाण सर्वाधिक असून, येथे ७४.५७ टक्क्यांहून अधिक ग्राहकांनी डिजिटल पर्यायाचा वापर केला. या माध्यमातून २३४३.५६ कोटी रुपये, म्हणजेच एकूण महसुलाच्या ७६ टक्के रक्कम जमा झाली.

ग्रामीण भागातही डिजिटल व्यवहारांचा वेगाने प्रसार होत असल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण मंडळातील ६७.५० टक्के ग्राहकांनी ५८४.६७ कोटी रुपयांचा भरणा ऑनलाईन केला. ही वाढ ग्रामीण भागातील वाढती तांत्रिक साक्षरता आणि डिजिटल सुविधांवरील विश्वास अधोरेखित करणारी आहे.

एकेकाळी बिल भरणा केंद्रांवर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आता जवळपास इतिहासजमा होताना दिसत आहेत. जिल्ह्यात केवळ २८.९८ टक्के ग्राहकांनी ऑफलाईन पद्धतीने (रोख किंवा चेक) बिल भरले असून, महसुलातील त्यांचा वाटा २२.७६ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला आहे.

महावितरणने ग्राहकांसाठी www.mahadiscom.in वेबसाइट, ‘महावितरण’ मोबाइल ॲप, महापॉवर पे आणि इतर पेमेंट गेटवेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाईन बिल भरणाऱ्यांना दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सवलत, मुदतीपूर्वी भरणाऱ्यांना ‘तत्पर देयक सवलत’, तसेच ‘गो-ग्रीन’ पर्याय स्वीकारल्यास वार्षिक १२० रुपयांची अतिरिक्त सवलत दिली जाते.

“डिजिटल पेमेंटमुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचत असून ही प्रक्रिया पर्यावरणपूरक आहे. त्यामुळे उर्वरित ग्राहकांनीही डिजिटल पर्याय स्वीकारावा.- दिलीप दोडके, मुख्य अभियंता,नागपूर परिमंडल महावितरण

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpur's digital leap: 71% electricity bills now online.

Web Summary : Nagpur sees a surge in online electricity bill payments. 71% of low-voltage consumers pay digitally, contributing 77% of revenue. Nagpur city leads with 74% online adoption, while rural areas show increasing digital literacy. MahaVitaran offers incentives for online payments.
टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर