शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

कॅलिफोर्नियातील बोट दुर्घटनेत नागपूरकर ‘डेंटिस्ट’चा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 21:25 IST

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बोटीला लागलेल्या आगीत मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ.संजिरी देवपुजारी (३१ वर्ष) व त्यांचे पती कौस्तुभ निर्मल यांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसंजिरी देवपुजारी, पती कौस्तुभ निर्मल यांच्यासाठी ठरली काळरात्र : वैद्यकीय तज्ज्ञ सतीश देवपुजारी यांची मुलगी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात बोटीला लागलेल्या आगीत मूळच्या नागपूरकर असलेल्या डॉ.संजिरी देवपुजारी (३१ वर्ष) व त्यांचे पती कौस्तुभ निर्मल यांचा मृत्यू झाला. शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.सतीश देवपुजारी हे संजिरी यांचे वडील आहेत. ही माहिती कळताच शहरातील वैद्यकीय जगताला धक्का बसला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. देवपुजारी हे तातडीने अमेरिकेला रवाना झाले आहेत.डॉ. संजिरी व कौस्तुभ हे दोघेही ‘स्कुबा डायव्हिंग’साठी या बोटवर गेले होते. त्यांची एकूण ‘ट्रीप’ ही तीन दिवसाची होती. दक्षिण कॅलिफोर्नियाच्या सॅन्टा बारबरा किनाऱ्याजवळील सांताक्रूझ या बेटानजिक ही बोट रात्री थांबविण्यात आली होती. या बोटमध्ये एकूण ३८ प्रवासी व कर्मचारी होते. २ सप्टेंबर रोजी पहाटे अचानक बोटीला आग लागली. सर्व प्रवासी साखरझोपेतच असताना ही आग लागल्याने कुणालाही सांभाळण्याची संधीच मिळाली नाही. बोटवरील पाचही कर्मचारी वाचले परंतु प्रवासी वाचू शकले नाहीत. अमेरिकेच्या कोस्टगार्डला २० प्रवाशांचे शव सापडले. आगीमुळे ओळख पटविणेदेखील कठीण झाले असल्यामुळे प्रवाशांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात येणार आहे.दोन वर्षांपूर्वी झाले होते लग्नडॉ.संजिरी यांचे शिक्षण शरद पवार कॉलेज ऑफ डेंटिस्ट्री येथून झाले होते. त्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीला गेल्या होत्या. डिसेंबर २०१६ मध्ये त्यांचे कौस्तुभ निर्मल यांच्याशी लग्न झाले होते. कौस्तुभ हे मूळचे जयपूर येथील होते व स्टॅमफोर्ड येथे स्थायिक झाले होते. ते वित्त क्षेत्रात कार्यरत होते. ‘विकएन्ड’साठी दोघेही या बोटवर गेले. तीनदिवसीय सहलीतील अखेरच्या टप्प्यात हा जीवघेणा अपघात झाला व त्यात दोघांनाही जीव गमवावा लागला.कुटुंबीय अमेरिकेला रवानायासंदर्भात प्रतिक्रियेसाठी डॉ.सतीश देवपुजारी किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु त्यांच्या काही परिचितांनी दिलेल्या माहितीनुसार ते अमेरिकेला रवाना झाले आहेत. शिवाय त्यांची मोठी मुलगी डॉ.श्रुती यादेखील अमेरिकेलाच असते व त्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

टॅग्स :Californiaकॅलिफोर्नियाAccidentअपघातDeathमृत्यू