शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  आयुर्वेदच्या पीजीच्या जागा धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:42 IST

राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच झाली नाही. ‘सीसीआयएम’ने नुकत्याच केलेल्या महाविद्यालयाच्या पाहणीत रिक्त पदाच्या त्रुटीवर बोट ठेवले आहे तर, शासनाने ‘सीसीआयएम’ला तीन महिन्यात त्रुटी दूर करू, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली आहे.

ठळक मुद्देरिक्त पदांचे संकट : कशी होणार त्रुटींची पूर्तता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील खासगी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागा १० टक्क्याने वाढल्या असताना, नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा मात्र रिक्त पदांमुळे धोक्यात आल्या आहेत. गेल्या १२ वर्षांपासून पदभरतीच झाली नाही. ‘सीसीआयएम’ने नुकत्याच केलेल्या महाविद्यालयाच्या पाहणीत रिक्त पदाच्या त्रुटीवर बोट ठेवले आहे तर, शासनाने ‘सीसीआयएम’ला तीन महिन्यात त्रुटी दूर करू, असे आश्वासन देऊन वेळ मारून नेली आहे.शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात सध्या १०० जागांवर पदवी (यूजी) व ६० जागांवर पदव्युत्तर(पीजी)साठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या कॉलेजमध्ये एकूण ६४ अध्यापकांचा जागा मंजूर आहेत, परंतु त्यापैकी ११ जागा रिक्त आहेत. यातच ऑगस्ट २०१९ मध्ये तीन अध्यापक निवृत्त होणार असल्याने महाविद्यालय आणखी अडचणीत येणार आहे. सूत्रानुसार, तीन महिन्यांपूर्वी ‘सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन’ (सीसीआयएम) दिल्लीच्या चमूने महाविद्यालयाचे निरीक्षण केले. यात अध्यापकांची कमतरता, पायाभूत सोयींचा अभाव, पुस्तकांची कमतरता, जागांचा अभाव आदी त्रुटी काढल्या. तीन महिन्यांमध्ये त्रुटींची पूर्तता करू, असे आश्वासन महाविद्यालय प्रशासनाच्यावतीने राज्य शासनाने २० मे २०१९ रोजी ‘सीसीआयएम’ला दिले. या आश्वासनावर तूर्तास ६० जागांवर प्रवेश देण्याची परवानगी मिळाली. परंतु अपुऱ्या मनुष्यबळामुळे पीजीच्या जागा संकटात आल्याचे वास्तव आहे.पीजीच्या ८४ जागांसाठी ७५ अध्यापकाची गरजशासकीय आयुर्वेद रुग्णालय ‘पीजी’च्या ६० वरून ८४ जागांवर प्रवेश देण्याच्या प्रयत्नात आहे. या जागांसाठी ७५ अध्यापकांची गरज आहे. मात्र, जी रिक्त आहेत तीच पदे २००७ पासून भरण्यात आली नाहीत. यामुळे भविष्यात ‘पीजी’च्या जागा वाढण्याऐवजी त्यावर संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न‘पीजी’च्या जागेला घेऊन ‘सीसीआयएम’ने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्य शासनानेही यासंदर्भात आश्वासन दिले आहे. यामुळे ‘पीजी’च्या जागा संकटात येणार नाही, याची खात्री आहे.डॉ. गणेश मुक्कावारअधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद रुग्णालय

टॅग्स :Government ayurvedic college nagpurशासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरdoctorडॉक्टर