शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

बॉलिवूड चित्रपटांचे साऊंड डिझाईन करतो नागपूरचा अश्विन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:42 IST

मायानगरीत प्रचंड स्ट्रगल करावा लागतो. असंख्य तरुण संधी मिळावी म्हणून मायानगरी गाठतात. मात्र यातील बोटावर मोजण्याइतक्यांनाच यश मिळते. बाकीच्यांचा वाट्याला मात्र अखेरपर्यंत स्ट्रगलच येतो. परंतु नागपूरचा अश्विन भरडे याला अपवाद ठरला. आपल्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजे एडिटींग अ‍ॅन्ड साऊंड डिझाईनिंगमध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर मायानगरीत अनेक चित्रपटात आपल्या कामाची चुणूक दाखवून आपले भक्कम स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.

ठळक मुद्देआवडीच्या क्षेत्रात घेतली भरारी : अभ्यासक्रमातही सुवर्ण यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मायानगरीत प्रचंड स्ट्रगल करावा लागतो. असंख्य तरुण संधी मिळावी म्हणून मायानगरी गाठतात. मात्र यातील बोटावर मोजण्याइतक्यांनाच यश मिळते. बाकीच्यांचा वाट्याला मात्र अखेरपर्यंत स्ट्रगलच येतो. परंतु नागपूरचा अश्विन भरडे याला अपवाद ठरला. आपल्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजे एडिटींग अ‍ॅन्ड साऊंड डिझाईनिंगमध्ये त्याने सुवर्णपदक मिळविले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर मायानगरीत अनेक चित्रपटात आपल्या कामाची चुणूक दाखवून आपले भक्कम स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे.बॉलिवूड म्हटले की प्रत्येकाच्या मनात अभिनेता, अभिनेत्री किंवा फारफार तर गायक व संगीतकार व अपवादाने दिग्दर्शकाचे नाव आपल्या लक्षात येते. मात्र चित्रपट तयार होताना अनेक गोष्टींचा त्यात अंतर्भाव असतो. आजच्या आधुनिक काळात चित्रीकरण झालेल्या दृश्यांचे एडिटींग आणि त्यात वेगवेगळे आवाजाचे मिश्रण करणे (साऊंड डिझाईनिंग) ला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. गीतकारांच्या शब्दांना संगीतकाराच्या स्वरलहरी लाभतात तेव्हाच ते गाणे ऐकणाऱ्याला आनंदाची अनुभूती देते. त्याचप्रमाणे चित्रपटातील कोणत्याही दृश्याला त्यातील साऊंड इफेक्टमुळे भावना प्राप्त होतात.अश्विनसाठीही बॉलिवूड हे स्वप्न होते. मात्र हे त्याचे अंधपणे पाहिलेले स्वप्न नव्हते. वडील संजय भरडे हे प्रसिद्ध नवरंग क्रिएशनचे संचालक. यातून शहरात विविध नाटकांचे शो करण्याचे काम त्यांचे होते. त्यामुळे लहानपणापासून अश्विनचा या क्षेत्राशी व अनेक कलावंतांशी जवळचा संबंध आला व त्याच्यात या क्षेत्राविषयी आवड निर्माण झाली. चित्रपट दिग्दर्शक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अश्विनने करिअरचे एक निश्चित ध्येय ठरविले होते. या क्षेत्रासाठी पदवी अभ्यासक्रमाची सोय नसल्याने बारावी सायन्समध्ये चांगले गुण मिळाल्यानंतर घरच्यांच्या इच्छेप्रमाणे त्याने अभियांत्रिकीला प्रवेशही घेतला. याचदरम्यान दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन याने फिल्म अ‍ॅन्ड मीडिया या संस्थेच्या माध्यमातून हैदराबादमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू केला. ही माहिती त्याला कळली आणि ठरविलेले ध्येय घरच्यांना सांगून टाकले. कुटुंबीयांनी व संबंधातील अनेक मोठ्या अभिनेत्यांनी या क्षेत्रात स्ट्रगल असल्याचे सांगून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ध्येयाने प्रेरित झालेल्या या तरुणाने इंजिनिअरिंग सोडून चित्रपट तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठीे हैदराबाद गाठले. काही दिग्दर्शकांची प्रेरणा त्याला होती. त्यामुळे दिग्दर्शन कळण्यासाठी तांत्रिक बारकावे समजून घ्यावे लागतील, या निश्चित दिशेनुसार त्याने एडिटींग अ‍ॅन्ड साऊंड डिझायनिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला.तो संस्थेच्या पहिल्याच बॅचचा विद्यार्थी. मात्र हा चार वर्षांचा अभ्यासक्रम त्याने २०१६ मध्ये सुवर्ण पदक मिळवून पूर्ण केला. शिक्षण घेतानाच आलेल्या संधीतून त्याने दिग्दर्शक अनुराग बासू यांच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटाचे साऊंड डिझायनिंग केले होते. पदवी घेतल्यानंतर त्याने मुंबई गाठून संघर्षाला सुरुवात केली. राजकुमार हिराणी यांच्याप्रमाणे दिग्दर्शक होण्याचे त्याचे स्वप्न आहे. या स्वप्नाकडे वाटचाल करताना अश्विनने अवघ्या दोन वर्षात काही चित्रपटांचे, मालिकांचे व जाहिरातींचे साऊंड डिझाईन करून यशस्वी ठसा उमटविला आहे.- चित्रपट क्षेत्रात करिअरच्या अनेक संधीचित्रपटांमध्ये केवळ अभिनेता-अभिनेत्री होणे म्हणजे सर्व नाही. यात अनेक गोष्टी करिअरच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. या क्षेत्रातही संघर्ष आहे, मात्र एकदा का या क्षेत्रात वर्तुळ निर्माण झाले की कामाच्या अपार संधी आहेत. तुमच्या कामाचा ठसा उमटला पाहिजे. दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्याशी भांडण झाले होते, पण माझे काम पाहून त्यांनी परत दुसºया प्रोजेक्टसाटी बोलावून घेतले. त्यामुळे तरुणांनी चांगल्या कामासाठी परिश्रमाची तयारी ठेवून या क्षेत्रात यावे.- अश्विन भरडे, एडिटर व साऊंड डिझायनर 

 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडmusicसंगीत