शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या अल्फियाचा पुन्हा 'गोल्डन पंच', आशियाई एलिट मुष्टियुद्ध स्पर्धेत जिंकले सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2022 14:37 IST

आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी नागपूरची अल्फिया पठाण ठरली महाराष्ट्रातील पहिली महिला बॉक्सर

नागपूर : 'गोल्डन गर्ल' अशी ख्याती असलेली १९ वर्षांची आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियोद्धा अल्फिया अक्रमखान पठाण हिने नागपूरच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला. जॉर्डनमधील अम्मान शहरात सुरू असलेल्या एएसबीसी आशियाई एलिट बॉक्सिंग स्पर्धेत शुक्रवारी अल्फियाने ८१ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. वरिष्ठ गटात पदार्पणात अल्फियाचे हे पहिले विजेतेपद आहे. अशी कामगिरी करणारी महाराष्ट्राची ती पहिली मुष्टियोद्धा ठरली.

अल्फियाचे वडील अक्रमखान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्फियाने स्थानिक दावेदार इस्लाम हुसैलीवर सहज मात करीत कारकिर्दीत चौथ्या सुवर्णावर नाव कोरले. लढतीच्या पहिल्या फेरीत अल्फियाने प्रतिस्पर्धी खेळाडूवर ठोशांचा प्रहार केल्यामुळे हुसैली प्रतिकारयोग्य नसल्याचे रेफ्रीच्या लक्षात आले. रेफ्रीने आरएसएम (पंचांनी लढत थांबविणे) नियमानुसार पुढील लढत थांबवून अल्फियाला विजयी घोषित केले. अल्फियाने याआधी यूथ आणि ज्युनियर गटाचे सुवर्णपदक जिंकले होते.

सुवर्ण अपेक्षितच होते : अल्फिया

दरम्यान, जॉर्डन येथून 'लोकमत'शी बोलताना अल्फिया म्हणाली, 'या स्पर्धेत मला सुवर्णाची अपेक्षा होतीच. फायनलमध्ये मी आधीच्या तुलनेत अधिक आक्रमक होते. पहिल्या फेरीअखेर रेफ्रीने लढत थांबवताच मो सुवर्ण निश्चित झाले. आता मी राष्ट्रीय वरिष्ठ गट स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार आहे. अल्फियाचे वडील अक्रम खान हे नागपूर पोलीस दलात सहायक उपनिरीक्षक आहेत. त्यांनी मुलीच्या या कामगिरीमुळे माझे परिश्रम यशस्वी झाल्याचे सांगितले. अल्फियाच्या पराक्रमानंतर घरच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कोच गणेश पुरोहित यांनीही आपल्या युवा शिष्येच्या कामगिरीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

टॅग्स :boxingबॉक्सिंगnagpurनागपूर