शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

रूफ टॉप सोलर बसविण्यात नागपूरकर आघाडीवर

By आनंद डेकाटे | Updated: May 3, 2024 15:19 IST

Nagpur : एकट्या नागपुरात २४,३५७ रूफ टॉप, २५१ मेगावॉट विद्युत निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घराच्या छपरावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला द्यायची या ‘रूफ टॉप सोलर’, योजनेला नागपूरकर ग्राहकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. महावितरणच्या कार्यक्षेत्रात राज्यभरातील एकूण १.४० लाखावरील सोलर रुफ़ टॉप पैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात २४,३५७ ग्राहकांनी रुफ टॉप सोलर यंत्रणा बसवून पर्यावरणपुरक वीजनिर्मिती करीत वीजबिलातही भरघोस बचत सुरू केली आहे.

रूफ टॉफ सोलरची राज्यातील संख्या १ लाख ४० हजार ८०८ इतकी असून त्यांची स्थापित क्षमता तब्बल २,०५३ मेगावॉट आहे. त्यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील २४,३५७ रुफ़ टॉपचा समावेश असून त्यांची विद्युत निर्मिती स्थापित क्षमता २५१ मेगावॉट आहे. राज्यातील एकूण सोलर रुफ़ टॉपच्या तुलनेत १७.२९ टक्के सोलर रुफ़ टॉप एकट्या नागपूर जिल्ह्यात आहे. नागपूर परिमंडलाचा विचार करता वर्धा जिल्ह्यातील २,६५३ रुफ टॉप ग्राहकांसह परिमंडलातील एकूण २७,०१० ग्राहकांनी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती सुरु केली असून राज्यातील एकूण सोलर रुफ़ टॉप मध्ये नागपूर परिमंडलाचा वाटा १९.१८ टक्के आहे.

- आकडे बोलतातसात वर्षांपूर्वी राज्यामध्ये केवळ १,०७४ ग्राहकांकडून २० मेगावॉट सौरऊर्जा रूफ टॉप पद्धतीने निर्माण होत होती, गेल्या सात वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली असून एकूण ग्राहकांची संख्या १ लाख ४० हजार ८०८ इतकी झाली आहे, मागिल वर्षी ही संख्या ७६,८०८ इतकी होती. यातून सौरऊर्जा निर्मितीची क्षमता १,८६० मेगावॉट होती, एकट्या नागपूर जिल्ह्यात मागिल आर्थिक वर्षात तब्बल १०,०९४ ग्राहकांनी ८२ मेगावॅट स्थापित वीज निर्मिती करणाऱ्या रुफ़ टॉफ संचाची स्थापना केली आहे.

- अशी आहे योजनाछतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरायची, प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीजबिल शून्य येते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला देता येते, अशी ही योजना आहे. या योजनेत नोंदणी करण्यासाठी पीएम – सूर्यघर मोबाईल ॲपवर नोंदणी केल्यानंतर महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/ या संकेतस्थळावर जाऊन संपुर्ण प्रकिया पुर्ण करायची आहे. ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो.

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर