शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या मधुमती वऱ्हाडपांडे यांच्या कलाविष्काराने नागपूरकर मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 13:00 IST

नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सृजनअंतर्गत सिव्हील लाईन्समधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत अकोल्याच्या मधुमिता वऱ्हाडपांडे यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरु झाले आहे.

ठळक मुद्देचित्रकलेचे कुठलेही ज्ञान नसताना साकारली शेकडो चित्रेरंगकामाच्या उर्मीने सोडली नोकरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूरच्या दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रातर्फे आयोजित सृजनअंतर्गत सिव्हील लाईन्समधील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीत अकोल्याच्या मधुमिता वऱ्हाडपांडे यांच्या चित्रकृतींचे प्रदर्शन सुरु झाले आहे. मुक्त अमूर्त (अ‍ॅबस्ट्रॅक्ट) आणि निसर्गदृष्य (लँडस्केप) या दोन विषयांची निवडक चित्रे त्यांनी या त्यांच्या पहिल्याच चित्रप्रदर्शनात समाविष्ट केली आहेत. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे वरिष्ठ लेखा व प्रशासन अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाट्न गुरुवारी करण्यात आले.चित्रकलेचा आपल्याला कुठलाही गंध नव्हता. शालेय जीवनात जी चित्रे काढली व ज्या प्राथमिक स्वरुपाच्या परीक्षा दिल्या तेवढाच काय तो चित्रकलेचा संबंध असल्याचे मधुमती सांगतात. मात्र दोन वर्षांपूर्वी मनातील एकाएकी दाटून आलेल्या अस्वस्थतेला वाट करून देण्यासाठी त्यांनी चित्रे काढणे सुरु केले. पुढे तहानभूक विसरून त्या चित्रे काढीत राहिल्या. यात प्रामुख्याने मुक्त अमूर्त चित्रांचा अधिक समावेश होता. या चित्रांमधून त्यांच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाल्यानंतर त्यांनी निसर्ग दृष्यांचीही चित्रे साकरण्यास सुरुवात केली. पुढे चित्रांची आवड इतकी तीव्र झाली की त्यांनी आपली खाजगी नोकरी सोडून पूर्णवेळ चित्रे काढण्यात स्वत:ला झोकून दिले.काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरावावे या त्यांच्या ज्येष्ठ मुलाने केलेल्या सूचनेचा स्वीकार करून त्यांनी हे प्रदर्शन प्रथम नागपुरात भरवले आहे.कलेचा अविष्कार हा वयाच्या कुठल्याही टप्प्यात व्यक्तीला जाणवू शकतो, त्याने आपल्यातील त्या सुप्त शक्तींना बाहेर येण्याची संधी व वेळ दिला पाहिजे असे मत मधुमती वऱ्हाडपांडे व्यक्त करतात. हे प्रदर्शन येत्या १६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

टॅग्स :South Cental Zone Cultural Centre, Nagpurदक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र