शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

धडाकेबाज आयुक्त मुंढे यांच्याकडून नागपूरकरांना अनेक अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 10:08 IST

नागपूर महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून नागपूरकरांना अनेक अपेक्षा आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकाऱ्यांमध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते तुकाराम मुंढे यांचे; वेगाने कामे पूर्ण करणे आणि धडाकेबाज निर्णय यामुळे ते प्रसिद्ध आहेत. नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची त्यांनी सूत्रे स्वीकारताच नागरिकांना याचा प्रत्यय आला आहे. प्रशासनाला शिस्त लावली. दोषी अधिकारी व कंत्राटदारांना दणका दिला. अतिक्रमण हटवून रस्ते, फूटपाथ मोकळे केले. आठवडी बाजारातील अतिक्रमण हटवून शिस्त लावली. मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. राज्य सरकारच्या योजनात स्वत:चा वाटाही देणे अशक्य झाले आहे. यातून सावरण्यासाठी आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न मुंढे यांनी चालविला आहे. मनपा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाले आहे. यासाठी फारसा निधी खर्च होणार नाही. गरज आहे ती निर्णयाची. त्या आता मार्गी लागतील, अशी नागरिकांना आशा आहे. मुंढे हे जनता दरबारच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क साधत आहेत. परंतु ३५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरातील सर्वच नागरिकांना त्यांच्याशी संपर्क साधणे शक्य नाही. आयुक्तांचे नागरी समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून समस्या मांडल्या आहेत. मुंढे यांची वेगाने कामे करण्याची पद्धत विचारात घेता ते दिलासा देतील, अशी नागरिकांना आशा आहे. अर्धवट व निकृ ष्ट सिमेंट रोडशहरातील रस्ते मजबूत व टिकाऊ व्हावेत, यासाठी महापालिकेने ७५० कोटींच्या सिमेंटीकरणाची योजना हाती घेतली. परंतु काही वर्षातच सिमेंट रस्त्यांना भेगा पडायला लागल्या आहेत. नागरिकांनी सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या. परंतु महापालिकेने डोळे बंद केले आहे. पहिल्या टप्प्यात तिजोरीतून १०१.१८ कोटी खर्च करून २५.७७५ कि.मी. लांबीच्या ३० रस्त्यांचे सिमेंटीकरणाचे कार्यादेश ६ जून २०११ रोजी काढले. दुसºया टप्प्यात ५५.४२ कि.मी.च्या २७९ कोटींच्या कामाचे कार्यादेश काढण्यात आले. प्रकल्पाचा खर्च हळूहळू ३४० कोटींवर गेला. तिसºया टप्प्यात ३२४ कोटींचे सिमेंट रस्ते केले जात आहेत. यातील कामे पूर्ण झाली तर काही सुरू आहेत. अनेक रस्त्यांचे काम रखडले आहे. काही मार्गावरील चौक तसेच सोडण्यात आले. त्यामुळे कंबर, पाठीला झटके बसतात. त्यातच सिमेंट रस्त्याने जाताना व्हायब्रेशन होते. पहिल्या टप्प्यात जगनाडे चौक ते अशोक चौकादरम्यान करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर भेगा पडल्या आहेत. या मार्गाची जाडी २० सेंटीमीटर आहे. वास्तविक ती २५ ते ३० सेंटीमीटर असायला पाहिजे. या मार्गावर व्हाईट टॉपिंगचा वापर करण्यात आला आहे.अतिक्रमणाच्या विळख्यात फूटपाथउच्च न्यायालयाने शहरातील रस्ते व फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. महापौर संदीप जोशी यांनी फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली. परंतु तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अतिक्रमण कारवाईला गती दिली. त्यांनी आदेश देताच दोन दिवसात शहरातील ६२ बाजार व शहराच्या विविध भागातील फूटपाथ अतिक्रमणमुक्त केले. परंतू अतिक्रमण पथक माघारी फिरताच फूटपाथवरील अतिक्रमण पूर्ववत झाले. महाल, बडकस चौक, गांधीबाग, इतवारी,सदर, मंगळवारी बाजार,जरीपटका, सीताबर्डी मार्केट, सक्करदरा,मानेवाडा रोड धरमपेठ, रामनगर आणि लक्ष्मीनगर भागात मोठ्या प्रमाणात दुकान मालकांचे अतिक्रमण फूटपाथवर झालेले आहे. प्रशासनाने कारवाई केली होती, मात्र त्यानंतर अवस्था पुन्हा जैसे थे झाली. फेरीवाले किंवा हॉकर्स एकतर फिरता व्यवसाय करतात किंवा त्या ठिकाणी थोड्या वेळापुरते असते. मात्र मोठ्या दुकानांचे अतिक्रमण ही कायमची समस्या आहे. व्यवसायिकांना एक शिस्त लावण्याचे आव्हान आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासमोर राहणार आहे.‘सिवर लाईन’च्या समस्येवर उपाय कधी ?नागपूर शहरातील अनेक भागात ‘सिवर लाईन’ तुंबण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अगदी ‘पॉश’ म्हणविल्या जाणाºया वस्त्यांमध्येदेखील हा प्रकार दिसून येतो. पावसाळ्यात तर यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. गोपालनगर परिसरात माटे चौकाजवळील जुगलकिशोर ले-आऊट पासून ते प्रतापनगरच्या नवनिर्माण कॉलनीचा बगीचा या मार्गावरील ‘सिवर लाईन’ अनेक दशके जुनी असून जीर्ण झाली आहे. वारंवार येथील गडर ‘चोक’ होतात व परिसरातील विहिरींमधील पाणी वारंवार दूषित होते आणि आरोग्याला धोका निर्माण होतो. ही ‘सिवर लाईन’ बदलण्यासाठी चार महिन्याअगोदर काही भागात काम सुरू झाले. परंतु त्यानंतर ते ठप्प पडले. खोदकाम तसेच असून रस्त्यांवर पाईप पडलेले आहेत. झालेल्या कामाचा दर्जादेखील सुमारच आहे. अद्यापही यासंदर्भात ठोस पावले उचलल्याचे दिसून येत नाही. कमी अधिक प्रमाणात शहरात ‘सिवर लाईन’ची अशीच दुर्दशा आहे. अनेक ठिकाणी तर या ‘लाईन’वर अतिक्रमण झाले आहे. याकडे मनपा प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत असून या समस्येपासून सुटका कधी मिळणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.मोकाट कुत्र्यांना आवर घालानागपूर शहरात ९० हजारांवर मोकाट कुत्री आहेत. रात्रीच्या सुमारास रस्त्यांवर झुंडीत राहणाºया मोकाट कुत्र्यांमुळे जीवघेणे अपघात वाढले आहेत. मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे. अपघातही वाढले आहेत. रात्रीला रस्त्यावर फिरणाºया या कुत्र्यांना आयुक्तांनी आवर घालावा, अशी शहरातील नागरिकांची मागणी आहे. शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यावर विशेषत: मटन मार्के ट असलेल्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर असतो. धावत्या वाहनांवर हल्ला करतात तर कधी वाहनांच्या खाली येऊन अपघाताचे कारण ठरतात. शहरातील वर्धा रोड, मानकापूर आरयूबी, तुकडोजी ते मानेवाडा चौक, रिंगरोड, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, सीए रोड, धंतोली, पारडी, सदर, मेयो, मेडिकल रुग्णालयाचा परिसर यासोबतच गल्लीबोळीतसुद्धा कुत्र्यांचा वावर वाढला आहे. दररोज २५ ते ३० कुत्र्यांवर नसबंदी केली जाते. परंतु कुत्र्यांची संख्या व होणारी नसबंदी याचा विचार करता ही समस्या सुटणार नाही. यासाठी महापालिकेने व्यापक नसबंदी मोहीम राबवावी.डुकरांमुळे आजाराचा धोकानागपूर शहरात जवळपास १० हजार डुक्कर आहेत. नदी, नाल्यात डुकरे फिरत असतात. नाल्यालगतच्या वस्त्यात डुकरांचा मुक्त संचार असतो. शहरालगतच्या झुडपी जंगल परिसरात डुकरांची संख्या अधिक आहे. डुकरांमुळे साथीचे रोग पसरतात. नागपूरकरांचेआरोग्य सांभाळण्यासाठी या मोकाट डुकरांना पकडणे आवश्यक आहे. महापालिकेने तामिळनाडूच्या एका एजन्सीसोबत करार केला. त्या एजन्सीचे डुक्कर पकडणारे पथक नागपुरात आले. काही दिवस डुकरे पकडण्याची मोहीम राबविली. मागील काही महिन्यापासून ही मोहीम बंद आहे. मोकाट डुकरांची नागरिकांत दहशत आहे. डुकरांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे