शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका न्यायालयीन पेचात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 18:37 IST

५ आॅक्टोबर २०१६ ला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीवर माजी जि.प. सदस्य बाबा आष्टणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.

ठळक मुद्देसर्कल पुनर्रचना व आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर : न्यायालयात आव्हान देण्याचा आष्टणकर यांचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्कल रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे, जिल्हा परिषदेच्या वर्षभरापासून खोळंबलेल्या निवडणुका लवकरच जाहीर होतील, असे संकेत मिळत आहेत. असे असले तरी, निवडणुकीच्या कार्यक्रमाला पुन्हा न्यायालयात चॅलेंज देण्यात येऊ शकते, याचीही शक्यता नाकारता येत नाही. कारण ५ आॅक्टोबर २०१६ ला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या सोडतीवर माजी जि.प. सदस्य बाबा आष्टणकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.जिल्हा परिषदेची निवडणूक सुरुवातीपासूनच न्यायालयीन पेचात सापडली आहे. सत्ताधाऱ्यांची मुदत २० मार्च २०१७ रोजी संपली. त्यामुळे निवडणूक तेव्हाच होणार, अशी शक्यता होती. त्यासाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. त्यानंतर पारशिवनी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीत आणि वानाडोंगरीचे रूपांतर नगर परिषदेत झाले. राज्य सरकारने २५ आॅक्टोबर २०१६ रोजी पारशिवनी नगरपंचायत करण्यासाठी अधिसूचना काढली. अधिसूचनेला पारशिवनी येथील प्रकाश डोमकी यांनी हायकोर्टात आव्हान दिले. त्यांची याचिका हायकोर्टाने नाकारली. दरम्यान, वानाडोंगरी नगर परिषद घोषित केल्यामुळे वानाडोंगरी भागातून जि. प. आणि पंचायत समितीच्या निवडणुका रद्द कराव्यात तसेच पारशिवनी नगरपंचायतीची निवडणूक घेण्यात यावी, अशा वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगरपंचायत वगळता जिल्हा परिषदेची निवडणूक घ्यावी, असे आदेश नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाला दिले होते. ही याचिका निकाली निघाली. परंतु आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या सर्कल आरक्षणाच्या सोडतीत जि.प.चे आरक्षण ५७ टक्क्यावर गेले असल्याबाबत जि.प.चे माजी सदस्य बाबा आष्टणकर यांनी आक्षेप घेतला होता. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. ती अद्यापही प्रलंबित आहे.यासंदर्भात बाबा आष्टणकर यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, न्यायालयाने स्पष्ट केले होते, ही याचिका निकाली लागेस्तोवर निवडणुका घेण्यात येऊ नये. तरीसुद्धा निवडणूक आयोगाने सर्कल पुनर्रचना व आरक्षण सोडतीसंदर्भात कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमाच्या विरोधात पुन्हा न्यायालयात जाणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक