शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषदेच्या ३३ कोटी ८७ लाखांचा अर्थसंकल्पाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 01:01 IST

जिल्हा परिषदेचा वर्ष २०२०-२१ करिता ३३ कोटी ८७ लाखांच्या अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी मंजुरी दिली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेचा वर्ष २०२०-२१ करिता ३३ कोटी ८७ लाखांच्या अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी मंजुरी दिली. वर्ष २०१९-२० च्या तुलनेत ४ कोटीने कमीचा हा अर्थसंकल्प आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच कमीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थ समितीकडून तयार करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावर सीईओ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. यामुळे तयार होणारा कायद्याचा पेच टाळण्यात आला. वर्ष २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात आरोग्यासाठी अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचे समजते. गेल्यावर्षीच्या तुलनेत हा अर्थसंकल्प वास्तविकतेवर आधारित असल्याचे सांगण्यात येते.सीईओच देणार मान्यता : भविष्यात होणाऱ्या सभेत मांडणार अहवालकोरोनाच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कायद्यानुसार ही सभा २७ मार्चपूर्वी घ्यायची होती. सभाच झाली नसल्याने शासनाकडे अर्थसंकल्प मान्यतेसाठी पाठविण्यात आला नाही. त्यामुळे वित्त विभागाने राज्यातील सर्व जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अर्धसंकल्पाला मान्यता देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा २७ मार्चपूर्वी घेणे शक्य नसल्याने अर्थसंकल्पाबाबत राज्य सरकारने पुढील मार्गदर्शन करावे, अशी विनंती जिल्हा परिषदेच्या वतीने राज्य सरकारकडे केली होती. यावर वित्त विभागाने दिलेल्या उत्तरात अर्थसंकल्पाचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात व राज्यात कठोर पावले उचलण्यात आलेली आहेत. राज्यात जमावबंदी लावण्यात आली आहे. अशा स्थितीत आमसभा होणे शक्य नसून जिल्हा परिषदांचे २०१९-२० चे अंतिम सुधारित आणि २०२०-२१ चे मूळ अंदाजपत्रक मान्य होणे शक्य नाही. त्याचे विपरीत परिणाम जिल्ह्यातील सर्वच मुख्यत्वे आरोग्यविषयक कामांवर पडतील. त्यामुळे अशा परिस्थितीत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी २०१९-२० चे अंतिम सुधारित आणि २०२०-२१ चे मूळ अंदाजपत्रक यांना मान्यता द्यावी व स्थिती नियंत्रणात आल्यानंतर संपन्न होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आमसभेत या अंदाजपत्रकाचा अहवाला मांडावा, असे वित्त विभागाचे उप-सचिव प्रवीणकुमार जैन यांनी सूचित केले आहे.२४ मार्च रोजी जि. प. ची अर्थसंकल्पीय सभा होणार होती. याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगीसुद्धा दिली होती. त्यामुळे सभेसाठी आवश्यक सर्व काळजी घेतली जाणार होती. मात्र नंतर परिस्थिती बदलली, विरोधी पक्षानेसुद्धा सभा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सभा रद्द करण्याचे आदेश दिले. सभा रद्द झाल्याचे सीईओ यादव यांनी राज्य सरकारला कळविले व पुढील मार्गदर्शनाची विनंती केली. यावर जैन यांनी ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार बहाल करणारे परिपत्रक गुरुवारी काढले.काही बदल करण्याचे अधिकार पुढील आमसभेला असतीलयाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव म्हणाले, सरकारने स्थितीचे गांभीर्य आणि अंदाजपत्रकाचे महत्त्व लक्षात घेता मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने हे अंदाजपत्रक मान्य करण्याचे अधिकार दिले आहेत. पुढील सभेत याचा अहवाल सादर केला जाईल. त्यात काही बदल करण्याचे अधिकार आमसभेला असतील. कोणतीही कामे विशेषत: आरोग्य विभागाची कामे खोळंबू नयेत यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे.

 

 

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरBudgetअर्थसंकल्प