शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या तरुणाने अमेरिकेत जिंकली एअराेडिझाईन स्पर्धा

By निशांत वानखेडे | Updated: April 17, 2025 18:53 IST

महेश्वर ढाेणेचे काैशल्य : ६० देशांच्या चमूंना मागे टाकले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : काैशल्य असले की कर्तृत्व एक दिवस उजळून निघते. विदर्भाच्या तरुणांमध्ये काैशल्य नाही, या टीकेला नागपूरच्या महेश्वर ढाेणे या तरुणाने ताकदीने उत्तर दिले. या पठ्ठ्याने थेट अमेरिकेत त्याची कर्तबगारी दाखवली. लाॅस एंजेलिस येथे झालेल्या एअराेडिझाईनच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महेश्वर नेतृत्व करीत असलेल्या टीमने वायु उड्डानाचा उत्कृष्ठ नमुना दाखवला व ६० देशांच्या टीमला मागे टाकत स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला.

अमेरिकेतील सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स यांच्याद्वारे लाॅस एंजेलिस येथे नुकतीच ही स्पर्धा घेण्यात आली. यात विविध देशातील ६० चमू सहभागी झाल्या हाेत्या. यात भारताकडून महेश्वरची ‘माॅव्हरीक इंडिया’ या टीमने यात सहभाग घेतला हाेता. या टीममध्ये १० सदस्य हाेते. महेश्वर हा या टीमचा प्रकल्प संचालक, पायलट आणि मुख्य उड्डाण निरीक्षक आहे. त्याच्या संकल्पनेतून विमानाचे डिझाईन तयार करण्यात आले. ही स्पर्धा डिझाईन, पे लोड कॅपॅसिटी आणि फ्लाईंग एरो परफॉर्मन्सवर आधारित होती. महेश्वरच्या विमानाचे वजन पे-लाेडसह १८ किलाेच्यावर हाेते. महेश्वरने रिमाेट कंट्राेलच्या मदतीने या भारी वजनाचे विमान असे उडविले की पाहणाऱ्यांना भुरळ पडली. या पे-लाेडसह विमानाचे माॅडेल उडविणे कठीण असते, पण या टीमने अनेक दिवस प्रॅक्टीस करीत आणि काैशल्य पणाला लावत ते करून दाखविले. महेश्वरने हवेत वेगवेगळे काैशल्य दाखवित, गिरक्या घेत विमान उडविले, ज्यामुळे परीक्षकांचीही मने जिंकली.

राष्ट्रीय स्पर्धेत पहिला क्रमांक

विशेष म्हणजे यापूर्वी २०२३ साली चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय साईज ड्राेन डेव्हलपमेंट चॅलेंज स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविला हाेता. यामध्ये देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या ८१ चमू सहभागी झाल्या हाेत्या, हे विशेष.

बालपणापासूनच एअराे डिझाईनची आवडमहेश्वर सुनील ढाेणे हा सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. महेश्वरला बालपणापासूनच विमानाचे डिझाईन बनविण्याची आवड आहे. त्याने आतापर्यंत सीड ड्राॅपिंग, थ्रीडी, फायटर जेट, डेल्टा, ग्लायडर, वाॅक अलाॅंग ग्लायडर, रबर पाॅवर अशी अनेक प्रकारची विमान माॅडेल तयार केली आहेत. यापुढे सखाेल अभ्यास करून सर्व विमाने भारतात बनावे, हे महेश्वरचे स्वप्न आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAmericaअमेरिका