शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विकृत मानसिकतेच्या मुलाने घेतला पित्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 11:54 IST

विकृत मानसिकतेच्या एका नराधमाने त्याच्या पित्याचे गुप्तांग आणि गळ्यावर चावे घेऊन त्यांची हत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकृत मानसिकतेच्या एका नराधमाने त्याच्या पित्याचे गुप्तांग आणि गळ्यावर चावे घेऊन त्यांची हत्या केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ही घटना घडली. विजय गोविंदराव पिल्लेवार (वय ५५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आरोपीचे नाव विक्रांत पिल्लेवार (वय २५) आहे.मृत विजय पिल्लेवार प्रॉपर्टी डीलिंग करायचे. त्यांना पत्नी, मुलगी आणि आरोपी विक्रांत नामक मुलगा आहे. विक्रांत एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून तो बॉडी मेन्टेन करण्यासाठी स्टेरॉईड आणि इतर सप्लीमेंटस् घेतो. शनिवारी सकाळी त्याने काय घेतले कळायला मार्ग नाही. मात्र तो विकृतासारखा वागू लागला. त्याच्या विचित्र वर्तनाची माहिती आईने त्याच्या वडिलांना दिली. त्यामुळे रात्री ९ च्या सुमारास विजय पिल्लेवार यांनी विक्रांतला काय झाले, कशाला असा वागतो, अशी विचारणा केली. त्यावरून तो वडिलांवर चवताळून गेला व त्यांना जबर मारहाण करत किचनमधून हॉलमध्ये आणि हॉलमधून बाहेर खेचत आणले. त्यांना खाली पाडून त्यांच्या गळ्ययावर आणि गुप्तांगावर चावे घेऊन त्यांना रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. विकृत विक्रांत एखाद्या जनावरासारखा वडिलांना चावे घेत होता. त्याची ही विकृती बघून आई आणि बहीण आरडाओरड करत घराबाहेर पळाली. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. त्यांनी हुडकेश्वर पोलिसांना माहिती कळविली. पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निपचित पडलेल्या विजय पिल्लेवार यांना मेडिकलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.पोलिसांनी त्याला अटक केल्याच्या काही वेळेनंतर काय झाले, कुठे झाले, कसे झाले, आपल्याला पोलीस ठाण्यात कशाला आणले, अशी विचारणा तो पोलिसांना करू लागला. त्याला आज दुपारी ४ वाजता पोलिसांनी न्यायालयात हजर केले. तेथेही त्याचे वर्तन तसेच होते. तुम्ही मला न्यायालयात कशाला आणले, आपण काय केले, आपला काय दोष आहे, असे प्रश्न करून त्याने पोलिसांना भंडावून सोडले होते.त्यांचा जीव वाचलाआरोपी विक्रांत त्याच्या वडिलांना मारत असल्याचे पाहून त्याची आई बचावासाठी पुढे धावली असता तिच्यावरही तो चवताळून धावला. त्याच्या बहिणीने आईला कसेबसे बाहेर नेले आणि त्या दोघी घरातून बाहेर पडल्यामुळे त्यांचे जीव वाचले. या घटनेमुळे हुडकेश्वर परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Murderखून