शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या प्रवासातून आलेला नागपूरचा युवक आजारी, कोरोना ची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 21:34 IST

व्यवसायासाठी ११ दिवस चीनमध्ये राहून भारतात परतलेला नागपूरचा एक युवक अचानक आजारी पडला. सर्दी, खोकला, ताप कमी होत नसल्याने युवक शहरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी आला.

ठळक मुद्दे११ दिवस होता चीनमध्ये : कुटुंब चिंतेत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : व्यवसायासाठी ११ दिवस चीनमध्ये राहून भारतात परतलेला नागपूरचा एक युवक अचानक आजारी पडला. सर्दी, खोकला, ताप कमी होत नसल्याने युवक शहरातील मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी आला. बुधवारी उपचारासंदर्भातील आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गुरुवारी त्याची कोरोना व्हायरसशी संबंधित तपासणी होणार असल्याची माहिती आहे. तपासणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्या युवकाला खबरदारी म्हणून मेडिकलमध्येच भरती ठेवण्यात येऊ शकते, अशीही माहिती आहे.नागपूर येथे रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय युवकाचा कार एक्सेसरीजचा व्यवसाय आहे. तो चीन येथून एक्सेसरीज मागवित होता. २६ डिसेंबर २०१९ ते ६ जानेवारी २०२० दरम्यान तो व्यवसायानिमित्त चीनमध्ये थांबला होता. तो भारतात आल्यानंतर त्याला ताप, सर्दी, खोकला झाला. चीनमधून परतल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण झाली तर नाही, अशी भीती त्याला वाटायला लागली. त्यामुळे युवकाने मेडिकलमध्ये संपर्क साधला. बुधवारी मेडिकलमध्ये आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केली. आता युवकाची कोरोना व्हायरस शी संबंधित तपासणी गुरुवारी होणार असल्याची माहिती आहे. मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली आहे.प्रसार होणार नाही हा उद्देशपीडित युवकाचे लग्न झाले आहे. लोकमतशी बोलताना तो म्हणाला की, त्याला दोन मुली आहे. मुले लहान असल्यामुळे चिंता वाटत होती. चीनमधून आल्यामुळे माझ्या आजाराचा कोरोना व्हायरसशी काही संबंध असेल तर पुढे गंभीर होईल. त्यामुळे लगेच तपासणी करून घेण्याचा निर्णय घेतला. असे काही असले तर वेळीच खबरदारी घेतल्यामुळे प्रसार होणार नाही. काही गोष्टीची खबरदारी घेणे गरजेचेअद्यापही नागपुरात कोरोना व्हायरसची पुष्टी झालेली नाही. तरीही आवश्यक काही खबरदारी घेऊन त्यापासून दूर राहता येऊ शकते. शक्यतो आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे. खोकलताना अथवा शिंकताना नाक व तोंडावर टिश्यू अथवा रुमालाने झाकावे. ज्यांना सर्दी अथवा तापचे लक्षण असेल त्यांच्या फार जवळ जाणे टाळावे. गर्दीच्या जागी जाऊ नये. विशेष म्हणजे चीनहून परतलेल्या व्यक्तीपासून दूर रहावे. भाजी व फळांना खाण्यापूर्वी पाण्याने स्वच्छ धुवावे. ज्या देशात या व्हायरसचा प्रकोप पसरला असेल तिथे प्रवास करणे टाळावे. सार्वजनिक स्थळांवर अथवा सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर शक्यतो टाळल्यास व्हायरसची लागण होणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनnagpurनागपूर