शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

बेनी, नशे सा चढ गया ओये..; बेफिक्रे झाले डिस्को दिवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 11:17 IST

बेनी दयाल. त्याला एक झलक पाहण्यासाठी देशभरातील तरुणाई डोळ्यात प्राण आणून बसलेली असते. एकदम हाय डिमांड सिंगर. पण, वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने सोमवारी नागपुरात आला आणि आपल्या तूफान परफॉर्मन्सने फेस्टिव्हलच्या समारोपाला बँग बँग करून गेला.

ठळक मुद्देतरुणांच्या जोशाला गगन ठेंगणे

आॅनलाईन लोकमतनागपूर:बेनी दयाल. तो दिसतो जितका वेगळा त्याचा आवाजही तितकाच वेगळा. त्याला एक झलक पाहण्यासाठी देशभरातील तरुणाई डोळ्यात प्राण आणून बसलेली असते. एकदम हाय डिमांड सिंगर. पण, वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलच्या निमित्ताने सोमवारी नागपुरात आला आणि आपल्या तूफान परफॉर्मन्सने फेस्टिव्हलच्या समारोपाला बँग बँग करून गेला. मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित त्याचा लाईव्ह इन कॉन्सर्ट पाहण्यासाठी दुपारी ४ पासूनच नागपूरकरांचे जत्थे स्टेडियममध्ये दाखल व्हायला लागले होते. पाय ठेवायलाही जागा नव्हती.अखेर तो क्षण आला. निवेदिकेने बेनी येत असल्याची वर्दी दिली. सगळे लाईट बंद झाले. म्युझिशियननी जागा घेतली. अवघे स्टेडियम स्तब्ध झाले. पण, बेनी काही दिसेचना. अचानक प्रकाशझोत सिलिंगवर गेला. बेनी वरून जम्प घेणार म्हणून साऱ्यांच्या नजरा वर. पुन्हा बेनी अदृश्यच. नेमके काय झाले कुणालाच कळत नसताना अचानक ड्रम जोरात वाजायला लागला आणि काळी पॅन्ट, काळा शर्ट, काळी टोपी अन् काळा चश्मा घातलेला बेनी बन के मुसीबत पिछे पडी हैं...या गाण्यावर अक्षरश: उड्या मारत स्टेजवर आला अन् पार्टी आॅल नाईटच्या मूडने आलेल्या तरुणाईने मोबाईलचे फ्लॅश लाईट आॅन करून त्याचे खास नागपुरी थाटात ग्रँड वेलकम केले. पुढे तब्बल दोन तास बेनीच्या गाण्यावर बेफिक्रे झालेल्या तरुणाईने बेनी, नशे सा चढ गया ओये...! म्हणत कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अखंड फेर धरला.

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूर