शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महिला डॉक्टरचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 13:07 IST

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या होस्टेलमध्ये ही घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देप्रकृती चिंताजनकमार्डच्या होस्टेलमध्ये घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला असेलल्या एका महिला डॉक्टरने स्वत:चा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता येथील मार्डच्या होस्टेलमध्ये ही घटना उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी मयूर शिंदे (वय २६) असे आत्महत्येचा प्रयत्न करणा-या डॉक्टर महिलेचे नाव आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, डॉ. अश्विनी मूळची बीड येथील रहिवासी होय. त्या डीओआरएल अभ्यासक्रमासाठी नागपुरात आल्या होत्या. मेडिकल परिसरातील मार्डच्या होस्टेलमध्ये ४२ क्रमांकाच्या रूममध्ये त्या राहत होत्या. डॉ. श्रुती तागडे आणि अन्य एक अशा दोन मैत्रिणी त्यांच्या सोबत राहायच्या. गुरुवारी सकाळी १० वाजले तरी डॉ. अश्विनी व्याख्यानाला (लेक्चरला) पोहचल्या नाही. त्यामुळे डॉ. श्रुती त्यांच्या रूमवर गेल्या. दार आतून बंद असल्यामुळे बराच वेळेपर्यंत त्यांनी दार ठोठावले. कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बाजुच्या खिडकीतून त्यांनी डोकावून बघितले असता अश्विनी पलंगावर पडून दिसल्या. त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. त्यामुळे डॉ. श्रुती यांनी आरडाओरड करून बाजुच्यांना गोळा केले. होस्टेलच्या कर्मचाऱ्यांनी दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. गंभीर अवस्थेतील डॉ. अश्विनी यांना तातडीने अतिदक्षता विभागात नेण्यात आले. त्यांनी स्वत:चा गळा सर्जिकल ब्लेडने कापून घेतल्याचा अंदाज आहे. बराच रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांची अवस्था चिंताजनक आहे. वृत्त लिहिस्तोवर त्यांच्यावर उपचार सुरू असून, अजनीचे पोलीस निरीक्षक शैलेष संख्ये तसेच त्यांचे सहकारी घटनेची चौकशी करीत आहेत. या घटनेमुळे मेडिकल परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्या