शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात तरुणीचे अपहरण करून मध्यप्रदेशात केली विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:45 IST

गुंगीच्या पदार्थाचा रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केल्यानंतर चौघांनी नागपूरमधील एका तरुणीला मध्यप्रदेशात नेले. तेथे एका व्यक्तीला तिची ७५ हजार रुपयात विक्री करून आरोपींनी तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. या घटनेचा तब्बल सात महिन्यांनंतर उलगडा झाला.

ठळक मुद्देबेशुद्ध करून मध्यप्रदेशात नेले७५ हजारात विकलेलग्नानंतर सात महिन्यांनी उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुंगीच्या पदार्थाचा रुमाल नाकाला लावून बेशुद्ध केल्यानंतर चौघांनी गिट्टीखदानमधील एका तरुणीला मध्यप्रदेशात नेले. तेथे एका व्यक्तीला तिची ७५ हजार रुपयात विक्री करून आरोपींनी तिचे त्याच्यासोबत लग्न लावून दिले. जुलै २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेचा तब्बल सात महिन्यांनंतर उलगडा झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन महिलांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.२२ वर्षीय तरुणीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, आरोपी आशा रोकडे, उषा रोकडे, चंदा गजभिये आणि त्यांचा एका साथीदार हे सर्व गिट्टीखदानमधील जगदीशनगरात तरुणीच्या शेजारी राहतात. त्यामुळे तरुणीसोबत त्यांची बोलचाल होती. तरुणीचे पालक तिच्या लग्नासाठी वर शोधत होते. ते माहित असल्यामुळे तरुणीसोबत आशा, उषा आणि चंदाने सलगी वाढवली. तिला चांगला वर शोधून देतो, असे सांगून १४ जुलै २०१८ ला दुपारी १२ च्या सुमारास आपल्या घरी बोलविले. तेथे बोलता बोलता आरोपीने तिच्या नाकावर रुमाल ठेवला. ती बेशुद्ध झाल्यानंतर आरोपींनी तिला तशाच अवस्थेत मध्यप्रदेशातील शहजानपूर येथे नेले. तेथील अशोक कैलास सिसोदिया याला ७५ हजार रुपयात तरुणीला विकले. त्यानंतर सिसोदियासोबत तिचे लग्न लावून दिले. यावेळी आरोपी महिलांनी सिसोदियाला आपली ओळख तरुणीची आई तसेच मावशीच्या रुपात दिली.दरम्यान, तरुणीचा संसार सुरळीत सुरू झाला. आता सात महिन्यानंतर तरुणी आणि तिचा पती सिसोदिया कौटुंबिक गप्पा करीत असताना त्यांच्यात लग्नापूर्वीच्या गोष्टी निघाल्या. यावेळी सिसोदियाने तुझी मला विक्री करताना तुझ्या आई आणि मावशीने ७५ हजार रुपये माझ्याकडून घेतल्याचे तरुणीला सांगितले. तेव्हा या प्रकरणाचा उलगडा झाला. आशा, उषा आणि चंदा पैकी कुणीच नातेवाईक नसल्याचे तरुणीने सांगितले. त्यानंतर सिसोदिया आणि त्याची पत्नी (तक्रारदार तरुणी) शहजानपूरच्या पोलीस ठाण्यात तेले. त्यांनी सर्व माहिती तेथील पोलिसांना दिली. शहजानपूर पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांना कळविले. त्यानंतर सिसोदिया दाम्पत्य शुक्रवारी नागपुरात पोहचले. तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी आशा, उषा, चंदा आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध अपहरण करून तरुणीची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.त्यांचा तोच धंदा ?आरोपी महिला सध्या परप्रांतात गेल्या आहेत. त्यांनी पुन्हा कुण्या दुस-या तरुणीला अशाच प्रकारे तिकडे नेले असावे, असा संशय आहे. एका विशिष्ट समाजातील रितीरिवाजाप्रमाणे लग्नाच्या बदल्यात वधूच्या माहेरच्यांना वर पक्षाकडून रोख स्वरूपात रक्कम दिली जाते. आरोपी महिला आणि त्यांचे साथीदार गरजू तरुणींना भूलथाप देऊन बाहेर प्रांतात नेत असावे आणि त्यांची तिकडे विक्री करीत असावेत, असा संशय आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी