शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महिला बँकेत उफराटा प्रकार; चोरांच्या हातात बँकेच्या किल्ल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 10:28 IST

नागपूर महिला बँकेत एकरकमी कर्ज भरणाऱ्या (ओटीसी) घोटाळ्यातील आरोपी जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर अणि सहायक उपनिबंधक पंकज वानखेडे यांच्यावर सहकार खाते मेहरबान असून, सहकार आयुक्तांच्या कृपेने त्यांची इतर बँकांमध्ये अवसायक म्हणून नियुक्ती झाली आहे.

ठळक मुद्देओटीएस घोटाळ्यातील आरोपी बँकेवर अवसायकसहकार आयुक्तांची कृपा

मोरेश्वर मानापुरे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : नागपूर महिला बँकेत एकरकमी कर्ज भरणाऱ्या (ओटीसी) घोटाळ्यातील आरोपी जिल्हा उपनिबंधक जे.के. ठाकूर अणि सहायक उपनिबंधक पंकज वानखेडे यांच्यावर सहकार खाते मेहरबान असून, सहकार आयुक्तांच्या कृपेने त्यांची इतर बँकांमध्ये अवसायक म्हणून नियुक्ती झाली आहे. घोटाळा करणारे दोन्ही आरोपी मोकळे असून चोरांच्या हातात बँकेच्या किल्ली, अशी स्थिती आहे.

सहकार मंत्र्यांच्या आदेशाकडे कानाडोळासहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी १५ आॅक्टोबर १०१७ रोजी दोन्ही घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देऊनसुद्धा जिल्हा उपनिबंधक नागपूर यांनी कोणतीही कारवाई केली नाही, किंबहुना पुन्हा घोटाळा करण्यास वाव दिल्याचे समितीचे मत आहे.

बँकेच्या चौकशीत येणार अडथळापंकज वानखेडे यांच्या नियुक्तीमुळे समता बँकेच्या सीआयडीद्वारे सुरू असलेली एमपीआयडी कायद्याची कारवाई तसेच ईडीच्या केसेसमध्ये अडथळा निर्माण होणार आहे. कारण चुकीच्या अधिकाऱ्याकडे चार्ज दिल्यामुळे त्यांना दोन ते तीन वर्षे केसेसची माहिती व्हायला लागतील व कर्जवसुली होणार नाही. ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळण्याची आशाच संपून जाईन. पूर्वीचे अवसायक चैतन्य नासरे यांनी कर्जवसुलीला वेग आणला होता. सध्या हिंगणा येथे कार्यरत असलेले नासरे यांच्याकडे पुन्हा अवसायकाची जबाबदारी द्यावी, अशी समितीची मागणी आहे. ठाकूर आणि वानखेडे यांच्या कार्यकाळात अवसायनातील नागपूर महिला बँकेला ओटीएस घोटाळ्यात १.२५ कोटींचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग-१ श्रीकांत सुपे यांनी शासनाकडे सादर केला होता. त्यांच्यावर जिल्हा उपनिबंधकांनी फौजदारी कारवाई न करता कलम ८० ची कारवाई सुरू केली. ती सध्या थंडबस्त्यात आहे. नागपूर शहर-३ चे उपनिबंधक जगताप चौकशी करीत आहेत. नवीन कायद्यांतर्गत दोन वर्षांत चौकशी पूर्ण होणे बंधनकारक आहे. ही चौकशी सहा टप्प्यात होणार आहे. वर्षभरात दोनच दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. ही कारवाई म्हणजे गंभीर प्रकणातील दोन्ही आरोपींना सहकारी खात्याने एकप्रकारे ‘गिफ्ट’ दिले आहे.

टॅग्स :bankबँक