शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

नागपूर हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 20:51 IST

राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून नवे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही जोर चढला असून, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात (१६ डिसेंबरनंतर) हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देसत्तास्थापनेचा तिढा सुटल्यानंतर तयारीला जोर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा अखेर सुटला असून नवे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही जोर चढला असून, डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात (१६ डिसेंबरनंतर) हिवाळी अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे.पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जाहीर केल्यानुसार नागपुरातील हिवाळी अधिवेशन हे ९ डिसेंबरपासून होणार होते. प्रशासकीय निवडणूक संपताच अधिवेशनाच्या तयारीला सुरुवातसुद्धा झाली होती. परंतु महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाल्याने अधिवेशनाच्या तयारीची गती मंदावली होती. परंतु आता सत्ता स्थापनेचा तिढा सुटला आहे. गुरुवारी नवे सरकार स्थापन होणार आहे. तेव्हा हिवाळी अधिवेशनाच्या तयारीलाही जोर चढला आहे. परंतु ९ डिसेंबर रोजी होणारे अधिवेशन त्याच दिवसापासून सुरू होण्याची शक्यता नाही. कारण विधिमंडळातील सूत्रानुसार सरकार स्थापन झाल्यानंतर विधिमंडळ सचिवालयाला अधिवेशनाच्या तयारीसाठी किमान १५ ते २० दिवस तरी लागतात. त्यामुळे ९ तारखेपासून अधिवेशन घेणे शक्य नाही. त्यामुळे ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. नागपुरातील काही अधिकाऱ्यांनी यासंदर्भात विधिमंडळातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनाही तिसऱ्या आठवड्यापासून अधिवेशन सुरू होणार असल्याचे सांगितले जाते. तिसऱ्या आठवड्यातील १६ डिसेंबर रोजी सोमवार येतो. त्यामुळे १६ किंवा त्यानंतरच अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची चर्चा आहे.विधिमंडळातील अधिकारी पुढच्या आढवड्यात घेणार आढावामंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशनाच्या तयारी संदर्भातील आढावा घेण्यासाठी मुंबई विधिमंडळातील अधिकारी पुढच्या आठवड्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने नागपुरातील तयारीला जोर चढला आहे. विधानभवनातील इतर तयारी सुरू आहे. मंडप टाकण्यासाठी बांबू महिनाभरापासून येऊन आहेत. परंतु तारीखच जाहीर नसल्याने मंडप टाकून करणार काय? म्हणून ते तसेच होते. आता मुंबईतील अधिकाऱ्यांकडून तारखेसंदर्भात इशारा मिळाल्याने मंडप टाकण्याचे कामही सुरू करण्यात येणार आहे.नवीन इमारतीत १२ मंत्र्यांची दालने, दुसऱ्या माळ्यावर आमदारांसाठी कॅन्टीनहीविधानभवन परिसरात कॅन्टीन तोडून नवीन इमारत बांधली जात आहे. हेरिटेज इमारतीला साजेशी इमारत बांधली जात असल्याने इमारतीला वेळ लागत आहे. अधिवेशनापर्यंत ती पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ती कामात येणार नाही. नवीन इमारतीच्या जागेवर पूर्वी कॅन्टीन आणि तीन मंत्र्यांची दालने होती. त्या ठिकाणी नवीन इमारतीत आता १२ मंत्र्यांची दालने व दुसºया माळ्यावर आमदारांसाठी कॅन्टीन राहणार असल्याची माहिती विधानभवनाचे पर्यवेक्षक व सहायक अभियंता संजय सतदेवे यांनी दिली. अधिवेशनाच्या दृष्टीने प्रशासकीय स्तरावर आमची तयारी सुरू आहे. आता खºया अर्थाने गती येणार आहे.आमदार निवास-रविभवनातील आरक्षण बंदअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार निवास आणि रविभवनातील तयारीही जोरात सुरू आहे. रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. निवासस्थानातील डागडुजीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

 

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनnagpurनागपूर