शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; अजित पवारप्रकरणी मंत्र्यांना सोडून अधिकाऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 15:30 IST

: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटच्या आधारावर महासंचालक परमवीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीटच्या आधारावर महासंचालक परमवीरसिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केलेले प्रतिज्ञापत्र हे दिशाभूल करणारे असल्याचे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.विधानभवन परिसरात आज शुक्रवारी दुपारी त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला.न्यायालयात सादर केलेलं प्रतिज्ञापत्र हे अधिकाऱ्यांना दोषी ठरवणारं असून ते चुकीचं असल्याचं ते यावेळी म्हणाले. जाणीवपूर्वक सगळी जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलली जात आहे. अतिशय सोयीस्कर असे अर्थ त्यातून काढले जात आहेत. या प्रकरणी आवश्यकता भासल्यास आम्ही उच्च न्यायालयात मध्यस्थी करू ही  बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे सभागृहात त्याच्यावर मत मांडणे योग्य ठरणार नाही. सादर करण्यात आलेले प्रतिज्ञापत्र हे सारांश स्वरुपातले असल्याने यात सत्य लपविण्यात आले आहे. त्यात संशयाला वाव आहे. याप्रकरणी तपास अजूनही संपलेला नाही असे ते पुढे म्हणाले. आमचे सरकार राज्यात असताना आम्ही या प्रकरणी कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. आम्ही २६ नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि प्रतिज्ञापत्र २७ नोव्हेंबरला सादर करण्यात आले होते, असे ते पुढे म्हणाले. 26 नोव्हेंबर 2018 रोजीच्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार सिंचन घोटाळ्यास जबाबदार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, तो निष्कर्ष त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर काढण्यात आला होता. मात्र आता सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यावेळचे मुद्दे समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. हे एक विसंगत प्रतिज्ञापत्र आहे असे परखड मत त्यांनी मांडले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन