शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सिकलसेल आजारावर नागपुरात होणार मंथन

By admin | Updated: May 22, 2015 01:52 IST

सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने २१ जून रोजी नागपूर येथे कार्यकर्ता मेळावा.

अकोला:सिकलसेल या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांवर योग्य उपचार कसे करता येतील, यासंदर्भात नागपूर येथे संबंधित आजारावर जनजागृती करणारे कार्यकर्ते मंथन करणार असून, जागतिक सिकलसेल दिनाचे औचित्य साधून २१ जून रोजी नागपूर येथे सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाच्यावतीने राज्यव्यापी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याला या सोसायटीचे राज्यभरातील विधानसभा मतदार संघनिहाय अध्यक्ष व कार्यकर्त्यांंची उपस्थिती राहणार आहे. नागपूर विभागातील अकरा जिल्ह्यांमध्ये सिकलसेलसारख्या क्लिष्ट आजाराचे असंख्य रुग्ण आहेत. मराठवाड्यातील नंदूरबार जिल्ह्यापासून ते पश्‍चिम विदर्भातदेखील या गंभीर आजाराची पाळेमुळे पसरत चालली आहेत. पूर्व विदर्भात सिकलसेलच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असताना उपचाराचे केंद्र नागपूर ऐवजी मुंबईमध्ये कार्यान्वित आहे. परिणामी, विदर्भातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईमध्ये जावे लागत असून, ही बाब खर्चिक तसेच अशक्यप्राय असल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामार्फत सिकलसेलच्या रुग्णांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असला तरी त्याचा लाभ मात्र रुग्णांना होत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यासंदर्भात मागील अनेक वर्षांपासून नागपूरस्थित सिकलसेल सोसायटी ऑफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून संबंधित रुग्णांपर्यंंत पोहोचून त्यांना उपचार पुरविल्या जात आहेत. २0१४ मध्ये नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात या संस्थेने सिकलसेलच्या रुग्णांना एसटीद्वारे मोफत प्रवास करण्याचा प्रश्न लावून धरला असता, शासनाने हिरवी झेंडी दिली. आरोग्य विभागाने १0 मार्च रोजी तसा अध्यादेशही लागू केला; परंतु यासंदर्भात अडीच महिन्यांच्या कालावधीतही एसटी महामंडळाने कोणतीही उपाययोजना केली नाही. राज्यातील सिकलसेलग्रस्त रुग्णांपर्यंंत पोहोचवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सिकलसेल सोसायटी ऑफ इंडियाने राज्यभरात विधानसभा मतदार संघनिहाय कार्यकारिणी तयार केली. येत्या १९ जून रोजी जागतिक सिकलसेल दिन असून, त्यानिमित्त २१ जून रोजी मोर भवन झाशी राणी चौक येथे राज्यव्यापी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन सोसायटीने केले आहे.