शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर होणार विमाननिर्मितीचे हब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 10:39 IST

टाल कंपनीमुळे नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘टाल’तर्फे बोईंगकरिता फ्लोअर बीम रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिहानमधील टाल कंपनीसाठी जागा संपादन करण्यास शासनाने पुढाकार घेतला व टाटा समूहाने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत मिहानमध्ये प्रकल्प सुरू केला. टाल कंपनीमुळे नागपूरचे एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग हबचे स्वप्न अधिक बळकट होईल, असा आशावाद केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे व्यक्त केले.मिहानच्या विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये (सेझ) ‘टाल’ या टाटा उद्योग समूहाच्या एअरोस्पेस व संरक्षण क्षेत्रातील कंपनीचे उत्पादन सुरू आहे. कंपनीने प्रकल्पातून बोईंग विमानाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या २५ हजार अ‍ॅडव्हान्स कम्पोझिट फ्लोअर बीम (एसीएफबी) या पार्टची रवानगी बोईंग कंपनीला मंगळवारी करण्यात आली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, महापौर नंदा जिचकार, टाल कंपनीचे अध्यक्ष विजय सिंग, बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते उपस्थित होते.गडकरी म्हणाले, आयआयआयटी, आयआयएम, सिम्बॉयसिस यासारख्या शैक्षणिक संस्थामुळे नागपूर शैक्षणिक हब म्हणून उदयास आले आहे. येथे कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता नाही. या प्रकल्पात स्थानिक युवक कार्यरत आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे. आणखी युवकांना रोजगार देण्यासाठी कंपनीने विस्तार करावा. टाल कंपनीच्या प्रकल्पात ९० टक्के स्थानिकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे.राज्य सरकारने मिहानमधील कंपन्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून दिल्यामुळे, मिहानमध्ये औद्योगिक प्रकल्पांना चालना मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी बोईंग इंडियाचे अध्यक्ष सलील गुप्ते व टाल कंपनीच्या संचालन विभागाचे अध्यक्ष यांच्यात एसीएफबी पार्टच्या रवानगी संदर्भातील कागदपत्रांचे हस्तांरण करण्यात आले. सलील गुप्ते यांनी बोईंग व टाल यांची भागीदारी भारताच्या स्किल इंडिया व मेक इन इंडिया अभियानात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. कार्यक्रमात टाल आणि बोईंग इंडियाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी