शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

२६/११ चा तपास करणारे शेंगळे नागपुरात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 21:51 IST

 स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला, हे अजमल कसाब जीवंत हाती लागल्यामुळेच सिद्ध होऊ शकले.

- नरेश डोंगरे 

नागपूर, दि. 14 -  स्वातंत्र्यानंतर भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला पाकिस्तानने करवून घेतला, हे अजमल कसाब जीवंत हाती लागल्यामुळेच सिद्ध होऊ शकले. देश हादरवून सोडणा-या या हल्ल्याच्या तपास करणारे तसेच हा हल्ला घडवून आणणारा क्रूरकर्मा, पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला फासावर टांगण्यात महत्वाची भूमीका वठविणारे तत्कालीन तपास अधिकारी केशव सखाराम शेंगळे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना २६/११ च्या आठवणी ताज्या केल्या.  

मुळचे मुंबईतील रहिवासी असलेले शेंगळे १९९० मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून राज्य पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतरची सलग २७ वर्षे  मुंबई पोलीस दलात सेवा देताना त्यांनी वेगवेगळळ्या जबाबदा-या सांभाळल्या. २९ जुलैला त्यांची सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) म्हणून पदोन्नतीवर नागपुरात बदली झाली. आज स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ते नागपुरात रुजू होण्यासाठी आल्याचे कळाल्यानंतर लोकमतने त्यांना गाठले. २६/ ११ च्या आव्हानात्मक तपासाबाबत त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी अनेक बाबींचा उलगडा केला. 

२६/११ चा हल्ला म्हणजे, देशाविरुद्धचे युद्ध होते. त्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. हा हल्ला करणारा केवळ एक दहशतवादी जीवंत हाती लागला होता आणि केवळ ९० दिवसात या हल्लयाचा तपास पूर्ण करायचा होता. हे आव्हान आम्ही स्विकारले होते.  त्यासाठी  मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या नेतृत्वात मी आणि अन्य १० (एकूण १२) अधिकारी तसेच १५० कर्मचा-यांची चमू रात्रंदिवस तपास कामात गुंतली होती. मरण्याच्या तयारीनेच आलेला क्रूरकर्मा कसाब काही बोलायला तयार नव्हता.  देश हादरवणा-या या हल्लयामागे पाकिस्तान आहे हे सांगण्यासाठी तो आढेवेढे घेत होता. पोलिसांच्या चौकशीला टाळत होता.   त्याच्या भाषेला पंजाबी टच होता. स्पष्ट हिंदी बोलत नसला तरी त्याला सारेच समजायचे. त्यामुळे तपास पथकाशी संबंधित पंजाबी महिलांकडून त्याची भाषा समजण्यास मदत होत होती. काहीही बोलायला, विचारायला गेलो की तुम्हारे पास पिस्तूल है... निकालो और मुझे शूट करदो... मै घबराता नही... असे म्हणायचा. आम्ही जन्नत मध्ये जाण्यासाठीच भारतात आलो.  त्याच्याजवळ बनावट आयटी प्रूफ होते. त्यामुळे तो जीवंत हाती लागला म्हणूनच पाकिस्तानी असल्याचे आणि या दहशतवादी हल्लयामागे पाकिस्तानच असल्याचे आपण सिद्ध करू शकलो. ९० दिवसात तपास पूर्ण करण्याचे आव्हान होते. १२ अधिकारी आणि १५० कर्मचा-यांच्या तपास पथकांसह अनेक वरिष्ठांनी रात्रीचा दिवस करून हे आव्हान  पेलले. त्या दिवसात कुणी झोपण्याची कल्पनाही करीत नव्हते अन कुणाला झोपही येत नव्हती. तपासादरम्यानच्या थरारक अनुभवाने आजही अंगावर शहारे उभे राहतात. 

भक्कम पुराव्याची साखळी जोडली गेल्यामुळे कसाबला फासावर टांगता आले. भारतावर सर्वात मोठा हल्ला करणा-या पाकिस्तानी दहशतवाद्याला फासावर टांगण्यासाठी करण्यात आलेल्या तपास पथकात आपण खारीचा वाटा उचलला, ही आपल्यासाठी कायम अभिमानाची बाब राहणार आहे, असेही शेंगळे यांनी सांगितले. 

१६ निघाले, ६ परतले !

२६/ ११ च्या दहशतवादी हल्लयाचा कट आखला गेल्यानंतर भारताकडे कसाबसह १६ पाकिस्तानी दहशतवादी निघाले. मात्र, त्यातील सहा जण वेगवेगळळ्या कारणामुळे माघारी परतले. येथील हिंदू असो अथवा मुसलमान, छोटी मुल असो की वृद्ध, माणसं असो की जनावरं सारेच्या सारेच आमचे शत्रू आहेत, असे तो सांगत होता. त्यांना संपवण्यासाठीच आम्ही आलो. ‘मिशन संपल्यानंतर  शेवटचा बॉम्बस्फोट घडवून स्वत:ही आत्मघात करण्याचा त्यांचा कट होता‘, असे कसाबने अखेर तपास अधिका-यांना माहिती देताना कबुल केले होते.