शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

नागपूर पश्चिम निवडणूक निकाल: कमळ माघारले, ठाकरे पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 13:11 IST

Nagpur West Election Results 2019: Sudhakar Deshmukh , Vikas Thakre

ठळक मुद्देथेट लढतीत देशमुख आणि ठाकरे यांच्यात काट्याची टक्कर

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघात याही वेळे भाजपचे सुधाकर देशमुख व काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यात थेट लढत होणार आहे. मागील निवडणुकीतही या दोघांमध्ये थेट लढत झाली होती. गेल्या २० वर्षांपासून भाजपचे कमळ फुलत आले आहे.२०१४ मध्ये भाजपचे सुधाकर देशमुख २६,४०२ मतांनी विजयी झाले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हे मताधिक्य कायम राहिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना येथे २७,२५२ मतांची आघाडी मिळाली. भाजपचे पक्ष संघटन येथे बळकट आहे; शिवाय देशमुख बऱ्याच पूवीपासून कामाला लागले आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत रस्सीखेच झाली. महापौर नंदा जिचकार, नगरसेवक भूषण शिंगणे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक रमेश चोपडे यांचीही नावे रेसमध्ये होती. यावेळी उमेदवार बदलेल, असा दावा पक्षांतर्गत केला जात असताना प्रत्यक्षात सुधाकर देशमुख यांनाच तिकीट मिळाले.प्रारंभीच्या फेऱ्यात आघाडीवर असलेले देशमुख माघारले आहेत.  आठव्या फेरी अखेर  ठाकरे यांना ४२४८७ मते तर देशमुख यांना ३५८०७ मते मिळाली आहेत. आघाडी ६६८० एवढी आहे.  

रिंगणात एकूण १२ उमेदवार

निवडणूक रिंगणात एकूण १२ उमेदवार असून त्यात बसपाचे अफजल फारूक,बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे डॉ. विनोद रंगारी आणि अपक्ष मनोजसिंग आणि राजीव रंजनसिंग हे प्रमुख उमेदवार आहेत. असे होते २०१४ चे चित्रसुधाकर देशमुख (भाजप-विजयी)विकास ठाकरे (काँग्रेस-पराभूत)

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nagpur-west-acनागपूर पश्चिमSudhakarrao Deshmukhसुधाकरराव देशमुखVikas Thakreविकास ठाकरे