शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Nagpur West Election Results 2019 :भाजपाच्या गडावर काँग्रेसचा झेंडा : विकास ठाकरे पश्चिम नागपूरचे नवे 'शिलेदार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 20:06 IST

Nagpur West Election Results 2019: Sudhakar Deshmukh Vs Vikas Thakre,Maharashtra Assembly Election 2019

ठळक मुद्देचुरशीच्या लढतीत ठाकरे विजयी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९९० पासून भाजपाच्या ताब्यात आलेल्या पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात अखेर कॉंग्रेसने बाजी मारली. काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी भाजपाचे सुधाकर देशमुख यांचा ६३६७ मतांनी पराभव केला. विकास ठाकरे यांना ८३२५२ मते पडली तर सुधाकर देशमुख यांना ७६८८५ मते पडली. सुरूवातीपासूनच पश्चिमच्या मतमोजनी दरम्यान चुरस निर्माण झाली होती. अखेर विकास ठाकरे यांनी भाजपाच्या या गडावर काँग्रेसचा झेंडा रोवला.मतमोजनीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच फेरीत सुधाकर देशमुखांनी ६०२ मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपाच्या गोटात उत्साह संचारला होता. परंतु, दुसऱ्या फेरीत विकास ठाकरे यांनी ७७८ मतांची आघाडी घेतली. पण लोकसभेत पश्चिम नागपुरात मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेता, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधुकच होती. मात्र तिसऱ्या फेरीने विकास ठाकरे यांना मजबूत लीड दिली. तिसऱ्या फेरीत ठाकरेंना देशमुखांपेक्षा ३१५४ मते अधिक पडली. त्यानंतर चवथ्या फेरीत १४०७, पाचव्या फेरीत १११८, सहाव्या फेरीत ३८८, सातव्या फेरीत ५७७ मते ठाकरे यांना अधिक पडली. परंतु आठव्या फेरीत सुधाकर देशमुख यांना १४२ मते अधिक होती. परत नवव्या आणि दहाव्या फेरीत विकास ठाकरे आघाडीवर होते. ११,१२ व १३ व्या फेरीत सुधाकर देशमुख यांना ठाकरे यांच्या पेक्षा जास्त मते होती. १४ फेरीला विकास ठाकरे, १५ व १६ फेरीला सुधाकर देशमुख आणि १७ व्या फेरीत परत विकास ठाकरे आघाडीवर राहिले. मतांचा असा चढउतार १७ फेरीपर्यंत कायम राहिला. पण सुरवातीच्या फेऱ्यांमध्ये ठाकरे यांनी मजबूत मते घेतल्यामुळे त्यांची लीड कमी होवू शकली नाही. अखेर ६३६७ मतांनी त्यांना विजयी घोषित करण्यात आले.या मतदार संघात बहुजन समाज पार्टीचे अफजल फारूक हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना ८४२७ मते मिळाली. तर नोटाला चवथ्या क्रमांकावर स्थान मिळाले. ३७१७ मतदारांनी नोटाची बटन दाबली. मात्र इतर सर्व उमेदवारांची जमानतही जप्त झाली. लोकसभेत भाजपाला पश्चिम नागपुरात मिळालेले यश लक्षात घेता, विधानसभेतही मतदार भाजपाच्या उमेदवाराला प्राधान्ये देईल, अशी शक्यता होती. मात्र विकास ठाकरे यांनी गेल्या पाच वर्षात केलेली मतदार संघाची बांधणी आणि निवडणुकीत केलेल्या नियोजनाच्या बळावर व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर विकास ठाकरे विजयी झाले.भाजपाचे आमदार सुधाकर देशमुख हे गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत निवडून आले होते. पण गेल्या पाच वर्षात त्यांनी मतदार संघाकडे दुर्लक्ष केले. मी मात्र त्याच ताकदीने गेल्या पाच वर्षांपासून मतदार संघातील कार्यकर्ते, नागरिक यांच्यासोबत जुळून होतो. त्यामुळे मतदार संघाने मला स्वीकारले आणि सुधाकररावांना नाकारले.विकास ठाकरे, विजयी उमेदवार, कॉंग्रेस

गेल्या पाच वर्षांत मी माझ्या विधानसभा क्षेत्रात भरपूर विकासाची कामे केली, तरीही मतदारांनी मला दिलेला कौल मान्य आहे. या निवडणुकीत मला पक्षाची मोलाची साथ मिळाली. कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्यासाठी अहोरात्र झटले. ज्यांनी मला स्वीकारले, माझ्या कार्यकर्त्यांनी,पदाधिकाऱ्यांनी माझ्यासाठी काम केले, त्यांचे मी आभार मानतो. सुधाकर देशमुख, पराभूत उमेदवार, भाजप

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vikas Thakreविकास ठाकरेnagpur-west-acनागपूर पश्चिम