शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

नागपूर-वर्धा ‘फोर्थ रेल्वे लाईन’

By admin | Updated: May 20, 2016 02:45 IST

आता नागपूर ते वर्धापर्यंत चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर दोन रेल्वे लाईन अस्तित्वात आहेत.

तिसऱ्या लाईनसोबतच होणार काम : अपेक्षित खर्चाचा मसुदा तयार होतोयवसीम कुरैशी  नागपूरआता नागपूर ते वर्धापर्यंत चौथी रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर दोन रेल्वे लाईन अस्तित्वात आहेत. तिसऱ्या रेल्वे लाईनचे काम वेगात सुरू असून चौथ्या लाईनचे काम यासोबतच करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतर्फे चौथ्या लाईनसाठी अपेक्षित खर्चाचा मसुदा तयार केला जात आहे.सध्याच्या दोन लाईनवर केवळ २०० रेल्वेगाड्या चालविल्या जाऊ शकतात पण, सध्या सुमारे ३२५ रेल्वेगाड्या धावत आहेत. नागपूर-वर्धा हा मध्य रेल्वेचा बॉटल नेक मार्ग म्हणून ओळखला जातो. तिसऱ्या व चौथ्या रेल्वे लाईनमुळे या मार्गावरील दबाव पुढील अनेक वर्षांसाठी कमी होईल. सूत्रानुसार चौथ्या लाईनला किमान ६०० कोटी रुपये खर्च लागू शकतो. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चौथ्या लाईनचे काम सुरू होऊ शकते. या मार्गावर असलेला रेल्वेगाड्यांचा दबाव व भविष्यातील योजना लक्षात घेता चौथी लाईन टाकण्याच्या दिशेने वेगात पावले उचलली जात आहेत. दोन वर्षांपूर्वी तिसरी लाईन टाकण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. नागपूर-नागभीड नॅरोगेज लाईन ब्रॉडगेजमध्ये परिवर्तित केल्यानंतर नागपूर-वर्धा तिसऱ्या लाईनची गरज उरणार नाही असे कारण पुढे करण्यात आले होते. परंतु, अनेक अडचणीनंतर तिसऱ्या लाईनचा मार्ग मोकळा झाला. आता चौथ्या लाईनचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेमार्ग अनुपलब्ध असण्याचा फटका मालगाड्यांना नेहमीच सहन करावा लागतो. चौथी लाईन पूर्ण झाल्यानंतर मालगाड्यांच्या वाहतुकीस गती मिळेल. यातून रेल्वेच्या उत्पन्नात वृद्धी होईल. प्रवासी गाड्यांपेक्षा मालगाड्यांच्या माध्यमातून रेल्वे मंडळाला जास्त महसूल मिळतो. याशिवाय नागपूर-वर्धा मार्गावर दुप्पट संख्येने गाड्या धावत असल्यामुळे रेल्वेलाईनच्या देखभालीसाठी जास्त वेळ मिळत नाही. यातच रेल्वेलाईनची देखभाल करणाऱ्या ट्रॅकमॅनची संख्या कमी आहे. अनेक ट्रॅकमॅन व गँगमॅन अधिकाऱ्यांच्या बंगल्यांवर काम करीत असतात. चौथ्या लाईनमुळे देखभालीची समस्याही दूर होईल.(प्रतिनिधी)तिसऱ्या लाईनचा खर्च दुप्पटतत्कालीन रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी २०१२-१३ या वर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर-वर्धा तिसऱ्या लाईनची घोषणा केली होती. या योजनेवर त्यावेळी २९७. ८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु, कामास विलंब केल्यामुळे योजनेचा खर्च वाढून ५०० कोटी रुपये झाला आहे. अजनी, खापरी, गुमगाव, बुटीबोरी, बोरखेडी, सिंदी, तुळजापूर, सेलू, वरुड इत्यादी गावांवरून जाणारा हा मार्ग ७६.३ किलोमीटर लांब आहे. या मार्गावर २३ मानवरहीत रेल्वेगेट आहेत. तिसऱ्या लाईनसाठी खापरी व जामठ्याजवळ लहान पूल बांधण्यात आले आहेत. धाम नदी व किस्तना नदीवर मोठे पूल बांधण्यात येत आहेत. चौथ्या लाईनसाठीही एवढेच पूल बांधले जातील. तिसऱ्या लाईनच्या योजनेचे प्राथमिक सर्वेक्षण २०१३ मध्येच पूर्ण झाले होते. परंतु, प्रत्यक्ष कामाला गेल्यावर्षीपासून सुरुवात झाली.