शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील दंगलीत अल्पवयीन आरोपींचादेखील समावेश; महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग

By योगेश पांडे | Updated: March 19, 2025 20:27 IST

महालात पोहोचले पारडी,जाफरनगर, बंगाली पंजा, गोरेवाड्यातील आरोपींचा समावेश : ५७ कलमांअंतर्गत गुन्हे दाखल, पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकल्याचे स्पष्ट

योगेश पांडे 

नागपूर : सोमवारी रात्री महाल व हंसापुरीमध्ये झालेल्या जाळपोळीच्या घटना व दंग्यांमध्ये बाहेरील तत्त्व सहभागी असल्याच्या चर्चांनी जोर पकडला होता. मात्र, प्रत्यक्षात सर्वच आरोपी हे नागपुरातील असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. परंतु सर्व आरोपी महालातील नव्हते. चिटणीस पार्क परिसरात झालेल्या दंगलीत पारडी, जाफरनगर, बंगाली पंजा, गोरेवाडा, पारडी येथूनदेखील समाजकंटक पोहोचले होते. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचादेखील समावेश होता. तसेच आरोपींनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करत पोलिसांवर पेट्रोल बॉम्बदेखील फेकल्याची बाब समोर आली आहे. आरोपींविरोधात एकूण ५७ कलमांअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी सायंकाळी एक गट छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एकत्रित आला व तेथे अनेकांच्या हाती शस्त्रे होती. धार्मिक घोषणा देत शिवीगाळ करण्यात येत होती. घटनास्थळ महाल असले तरी तेथे शहराच्या विविध भागांतून समाजकंटक पोहोचले होते. सीसीटीव्ही फुटेज व सोशल माध्यमांवरील व्हिडीओजच्या माध्यमातून अनेकांची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी यासी शेख मोहम्मद शरीफ, शेख फयाज शेख फिरोज, शेख अहफाज शेख फिरोज, मो.अल्ताफ मो.युसूफ, मो.जुमान रजाक, अब्दुल अमन पठाण, मो.इक्बाल ईस्माईल अन्सारी, मो.इजाद मो.इस्माईल, मो.अक्सार मो.ईस्माईल, मो.इजहार मो.ईस्माईल, शेख आबीद शेख नासीर, फैजान समीन शेख, अदनान समीन शेख, इमानुद्दीन शेख, अशफाक खान, काशीफ खान बशीर खान, इरफान अहमद कुरेशी, अल्ताफ मो.अनिस, वसीम रजा खान, नदीम खान रफीक खान, अब्दुल मैफुज अब्दुल वाहीद, मो.शेख हसन शेख, शेख अक्रम शेख अख्तर, अमीर रजा खान, अदनान अली युसूफ अली, शेख रियाज अब्दुल रशीद, दानिश खान, मो.अयाज मो.अयुब, शेख असरार शेख असलम, फैजन अमीन अन्सारी, मो.इम्रान मुजीब अशरफ, मो.अन्सारी, नसरुद्दीन शेख, अब्दुल अदनान अब्दुल वहीद, इबादुल्ला खान, वसीम शेख, शेख इम्रान शेख मुख्तार, मो.आवेज अन्सारी, सैफ अली खान, शेख नादीम शेख सलीम, मो.शाहनवाज, मो.हरीस उर्फ मो.ईस्माईल, युसुफ शेख उर्फ अब्दुल हफीज, शेख सादीक शेख नबी, मो.युसुफ यांच्यासोबत शेकडो आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग

दरम्यान, भालदारपुरा चौकाजवळ कर्तव्यावर असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावाकडून विनयभंग करण्यात आला. पोलिसांना जमावाने घेरले व मारहाण केली. त्यादरम्यान, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा शरीराला स्पर्श करत वर्दीवर हात टाकला. इतर महिला कर्मचाऱ्यांनादेखील अश्लिल शिवीगाळ करत त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्याकडे पाहून अश्लिल शेरेबाजी करत घाणेरडे इशारेदेखील केले.

असा घटना घटनाक्रम- छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमाव एकत्रित आला- जमावातील काही जणांकडून चिथावणी, पोलिसांना शिवीगाळ- भालदारपुरा व चिटणीस पार्क चौकात पोलिसांवर दगडफेक व हल्ला- पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब फेकून जीव घेण्याचा प्रयत्न- महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्दीवर हात टाकण्याचा प्रयत्न- पोलिसांच्या वाहनांची तोडफोड- गितांजली चौकात पोलिसांना घेरून दगडफेक- तेथील पोलीस बुथ, तसेच मोबाईल वाहने जाळली- पेट्रोल बॉम्बच्या सहाय्याने शासकीय वाहने जाळली- चिटणीस पार्क ते नातिक चौकादरम्यान घरे जाळण्याचा प्रयत्न

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस