शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कलयुग ने अपना रूप धारण कर लिया है..! नागपूर हिंसाचारात सोशल मीडियावर पोस्ट करणारे अडकणार

By योगेश पांडे | Updated: March 20, 2025 23:45 IST

सोशल मीडियावरील प्रक्षोक्षक पोस्टचे ‘पोस्टमॉर्टेम’ : हिंसाचार शेअर, कमेंट करणारे शेकडो कायद्याच्या कचाट्यात अडकणार

योगेश पांडेनागपूर : सोमवारी नागपुरात झालेल्या दंगल प्रकरणात हिंसेला चिथावणी देण्यासाठी चार टप्प्यांमध्ये आरोपींनी सोशल माध्यमांचा जास्त उपयोग केला. सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणात चार गुन्हे दाखल झाले असून, जवळपास ५० हून अधिक आरोपींची नावे स्पष्ट झाली आहेत. मात्र, हिंसाचाराचे समर्थन करत भडकावू पोस्टवर कमेंट करणारे किंवा शेअर करणारे शेकडो लोक कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी सोशल मीडियावर घटनेशी निगडीत ‘कंटेंट’चे अक्षरश: ‘पोस्टमॉर्टेम’ केले आहे. त्यात अनेक प्रक्षोभक व आक्षेपार्ह पोस्ट आढळल्या. ‘कलयुग ने अपना रूप धारण कर लिया है’ अशा प्रकारच्या कमेंट्स करत या हिंसेला आणखी चिथावणी देण्यात आल्याची बाब समोर झाली आहे.

सायबर पोलिस ठाण्यातील चारही गुन्हे हे सोशल मीडियावरील पोस्टच्या आधारे झाले आहेत. यात पोलिसांनी ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम व यू ट्यूबवरील ‘कंटेट’ची बारीक तपासणी केली. हिंसा भडकविण्याचा पॅटर्न चार टप्प्यांमध्ये दिसून आला. पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सकाळी झालेल्या आंदोलनाशी निगडीत तथ्यहीन पोस्ट शेअर करण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांवर झालेल्या दगडफेकीचे व्हिडीओ पोस्ट, शेअर करून हिंसाचार वाढण्यास हातभार लावण्यात आला. तिसऱ्या टप्प्यात हिंसाचारांच्या व्हिडीओजवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली तर अखेरच्या टप्प्यात हिंसाचाराचे समर्थन करत इतरांना रस्त्यावर उतरण्याबाबत व्हिडीओ व कमेंट्स पोस्ट करण्यात आल्या. पोलिसांकडून या सर्व टप्प्यांतील पोस्टचे विश्लेषण सुरू आहेत. अनेकांनी खोट्या नावांनी अकाऊंट तयार केल्याने त्यांचा शोध घेण्यास अडचण येत आहे.

अजाणतेपणे व्हिडीओ टाकणेदेखील पडले महागातकाही लोकांनी हिंसाचाराबाबत इतरांना माहिती व्हावी, यासाठी ट्विटरवर व्हिडीओ शेअर केले. नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी व कायदा-सुव्यवस्था परत रुळावर आणावी, अशी पोस्ट संबंधित युजरने केली होती. मात्र, त्याने व्हिडीओ शेअर केला असल्याने त्याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन्ही गटातील आरोपींचा समावेशसायबर पोलिसांनी दाखल केलेल्या चारही गुन्ह्यांमध्ये दोन्ही गटातील आरोपींचा समावेश आहे. काही जणांनी हिंसाचाराचे समर्थन करण्याचे टाळले, मात्र धर्मांध पोस्ट केल्या. त्यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

विकी कौशल अन् बॉलिवूडवर टीका भोवलीहिंसाचाराबाबत पोस्ट करत असताना एका युझरने चक्क बॉलिवूड व अभिनेता विकी कौशलविरोधात टीका केली. बॉलिवूडकडून जाणुनबुजून इतिहासाची मोडतोड करून सादर करण्यात येत असल्याची कमेंट संबंधित युझरला भोवली. त्याच्याविरोधातदेखील गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्तांविरोधात शिवराळ पोस्टइन्स्टाग्रामवर हिंसाचाराचे व्हिडीओ शेअर करणाऱ्या एका युझरने पोलिस आयुक्तांविरोधात शिवराळ भाषेचा उपयोग केला. पोलिस आयुक्त व हजारो कर्मचारी जीव धोक्यात घालून नागपूरला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांच्याविरोधात शिवराळ भाषेचा वापर करणाऱ्याविरोधातदेखील गुन्हा दाखल झाला आहे. त्या अकाऊंटधारकाचा शोध सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूर