शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Voilence: नागपूर पोलिसांना मंत्री बावनकुळेंकडून शाबासकी, आमदार दटकेंची मात्र नाराजी

By योगेश पांडे | Updated: March 18, 2025 20:15 IST

घटना झाल्यावर पोलिसांनी वेगाने शांतता प्रस्थापित केली व ते जास्त महत्त्वाचे होते, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

योगेश पांडे नागपूर : सोमवारी रात्री महाल, हंसापुरीत झालेल्या दोन गटांमधील संघर्ष, जाळपोळ यावरून राजकीय प्रतिक्रियादेखील सुरू झाल्या. राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळल्याबाबत नागपूरपोलिसांची पाठ थोपटली आहे. मात्र, दुसरीकडे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी पोलिसांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली आहे. विशेषत: त्यांनी तहसील पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांबाबत प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांच्या भूमिकेवर समाधान व्यक्त केले. पोलिसांची एकूण स्थिती योग्य पद्धतीने हाताळली आहे. दोन गटातील संघर्ष नियंत्रणात आणणे जास्त महत्त्वाचे होते. तणावपूर्ण परिस्थिती असताना ते ढाल बनून उभे राहिले. अशा स्थितीत पोलिसांसोबत समाजाने उभे राहणे आवश्यक आहे, असे बावनकुळे म्हणाले. या एकूण प्रकरणात गृहमंत्रालयाचे व पोलिसांचे कुठलेही अपयश नाही. घटना झाल्यावर पोलिसांनी वेगाने शांतता प्रस्थापित केली व ते जास्त महत्त्वाचे होते, असे प्रतिपादन बावनकुळे यांनी केले.

काय म्हणाले प्रवीण दटके?

दरम्यान, आ. प्रवीण दटके यांनी मात्र पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली. शहरात कुठेही तणाव झाला तरी मध्य नागपुरातील काही भागात अगोदर पोलिस बंदोबस्त लावण्यात येतो. मात्र, सोमवारी पोलिस बंदोबस्त वेळेवर लावण्यात आला नाही. हंसापुरीत अगोदरच पोलिस बंदोबस्त लावला असता तर तेथे जमावाने हल्ला करण्याची हिंमत केली नव्हती. घटना झाल्यावर पोलिस पोहोचले, मात्र तोपर्यंत नुकसान झाले होते, असा नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांनी पोलिस ठाण्यात फोन लावल्यावर त्यांना वेळेवर मदत का मिळाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पोलिस निरीक्षक संजय सिंग यांनी संवेदनशीलता दाखविली नाही, अशी नागरिकांची भूमिका आहे. जर यात सत्य असेल तर त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी मी करेन, असे दटके यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेPoliceपोलिस