शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा संकटात ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 22:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयांनी खर्चाची रक्कम वाढविण्याची मागणी केली आहे. जर ही रक्कम वाढविली नाही तर परीक्षा घेण्यास महाविद्यालये असमर्थ राहतील, अशी भूमिका प्राचार्य फोरमतर्फे घेण्यात आली आहे तर कुलगुरुंनी ही मागणीच फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत विद्यापीठ व प्राचार्य फोरम नेमके काय पाऊल उचलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ठळक मुद्देपरीक्षा घेण्यास महाविद्यालये असमर्थ : ‘प्राचार्य फोरम’ने केली खर्चाची रक्कम वाढविण्याची मागणी

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांसमोर एक वेगळेच संकट उभे ठाकले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा आयोजित करण्यासाठी महाविद्यालयांनी खर्चाची रक्कम वाढविण्याची मागणी केली आहे. जर ही रक्कम वाढविली नाही तर परीक्षा घेण्यास महाविद्यालये असमर्थ राहतील, अशी भूमिका प्राचार्य फोरमतर्फे घेण्यात आली आहे तर कुलगुरुंनी ही मागणीच फेटाळून लावली आहे. त्यामुळे पुढील कालावधीत विद्यापीठ व प्राचार्य फोरम नेमके काय पाऊल उचलतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.नागपूर विद्यापीठाकडून परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकेची ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ करण्यात येते. प्रश्नपत्रिकांच्या प्रती काढण्यासाठी लागणारा खर्च जास्त असून विद्यापीठाकडून मिळणारा निधी महाविद्यालयांना अपुरा पडतो आहे, अशी प्राचार्यांची तक्रार आहे. यासंदर्भात प्राचार्य फोरमने विद्यापीठासमोर अगोदरदेखील मुद्दा मांडला होता व विद्यापीठाने खर्चाची रक्कम वाढवून देण्याचे आश्वासनदेखील दिले होते. मात्र याची अंमलबजावणी झाली नसल्याचे प्राचार्य फोरमतर्फे सांगण्यात आले. जर खर्चाची रक्कम वाढवून देण्यात आली नाही तर हिवाळी २०१८ च्या परीक्षा घेण्यास महाविद्यालयांना अडचण होईल व परीक्षा घेण्यासाठीच महाविद्यालये असमर्थ राहतील, असे प्राचार्य फोरमने कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांची भेट घेऊन स्पष्ट केले.कुलगुरूंनी फेटाळली मागणीदरम्यान, ‘प्राचार्य फोरम’ने केलेली ही मागणी कुलगुरूंनी फेटाळून लावली. परीक्षा काळात परीक्षा केंद्रांना स्टेशनरी आणि इतर खर्चासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त निधी देण्यात येतो. त्यामुळे त्यात वाढ करण्याचा प्रश्नच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा