शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ‘पोस्टपोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 20:54 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २४ मार्च रोजी असून यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचा फटका उन्हाळी परीक्षांना बसला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या ११८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे२४ मार्चच्या परीक्षा आता ८ एप्रिल : दीक्षांत समारंभामुळे घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ २४ मार्च रोजी असून यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचा फटका उन्हाळी परीक्षांना बसला आहे. २४ मार्च रोजी होणाऱ्या ११८ अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. नवीन वेळापत्रकाप्रमाणे आता या परीक्षा ८ एप्रिल रोजी होणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी दिली आहे.नियोजित वेळापत्रकाप्रमाणे नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांच्या दुसऱ्या  टप्प्याला २४ मार्चपासून सुरुवात होणार होती. परंतु याच दिवशी १०५ वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे नियमानुसार दीक्षांत समारंभाच्या दिवशी कुठलीही परीक्षा आयोजित करण्यात येत नाही. कुठलाही विद्यार्थी समारंभापासून वंचित राहू नये हे यामागील कारण आहे. परंतु १०५ व्या दीक्षांत समारंभाच्या तारखेची घोषणा परीक्षा वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर करण्यात आली. त्यामुळे या दिवशी होणाऱ्या  परीक्षा ‘पोस्टपोन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात विद्यापीठाने अधिसूचना जारी केली आहे. तिसऱ्या  टप्प्याच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होतील, असे सांगण्यात आले आहे.हे आहेत प्रमुख अभ्यासक्रम२४ मार्च रोजीच्या ‘पोस्टपोन करण्यात आलेल्या परीक्षांमध्ये ‘एमए’ तृतीय सत्र, एमकॉम पहिले सत्र, बीए प्रथम सत्र, बीए द्वितीय वर्ष, ‘बीएसस्सी’ (गृहविज्ञान) प्रथम सत्र, बीकॉम अंतिम वर्ष, ‘बीएसस्सी’ प्रथम सत्र, ‘एमएसस्सी’ प्रथम सत्र, बीसीए अंतिम वर्ष, बीसीए प्रथम सत्र, एमसीएम प्रथम सत्र, एलएलएम तृतीय सत्र यांचा प्रामुख्याने समावेश आहे.संकेतस्थळावर सूचनाच नाहीहजारो विद्यार्थी या परीक्षांत सहभागी होणार आहेत. परंतु नागपूर विद्यापीठाच्या ढिसाळ कारभारामुळे सोमवारी सायंकाळपर्यंत विद्यार्थ्यांना याची माहितीच नव्हती. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरदेखील अधिसूचना ‘अपलोड’ करण्यात आली नव्हती.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा