शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

नागपूर विद्यापीठ अभ्यास अभ्यासमंडळांच्या निवडणुका एप्रिलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 10:50 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता अभ्यासमंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुका होतील.

ठळक मुद्दे२२ अभ्यास मंडळे राहणार अध्यक्षाविना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता अभ्यासमंडळ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. अभ्यासमंडळावर कुलगुरूंकडून प्रत्येक सहा जणांचे नामनिर्देशन केले जाणार आहे. त्यानंतर एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अभ्यासमंडळांच्या अध्यक्षांच्या निवडीसाठी निवडणुका होतील. आश्चर्याची बाब म्हणजे विद्यापीठातील २२ अभ्यासमंडळात एकही उमेदवार निवडून आलेला नसल्यामुळे ही मंडळे अध्यक्षाविना राहणार आहेत.नागपूर विद्यापीठात एकूण ७३ अभ्यासमंडळे आहेत. यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये निवडणुकादेखील झाल्या होत्या. ४४ अभ्यासमंडळांवर प्रत्येकी तीन जण निवडून आले होते, तर २२ अभ्यासमंडळांवर एकही पात्र उमेदवारच सापडला नव्हता. उर्वरित नऊ अभ्यासमंडळांवर तीनहून कमी उमेदवार निवडून आले. प्रत्येक अभ्यासमंडळावर कुलगुरू सहा उमेदवारांचे नामनिर्देशन करणार आहे. त्यातील एक उमेदवार हा विद्यापीठाच्या विभागातील असेल तर उर्वरित जण संलग्नित व संचालित महाविद्यालयातील असतील. यांच्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड होईल व अभ्यासमंडळाची स्थापना होईल. त्यानंतर सदस्य अभ्यासमंडळावर आणखी पाच जणांची नियुक्ती करू शकतील, असे विद्यापीठ कायद्यात स्पष्टपणे नमूद आहे.विद्यापीठात एकूण ४४ अभ्यासमंडळं स्थापन होतील व तेथे अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल, तर २२ ठिकाणी अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही.

कायद्याचा फटकामहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम-२०१६ नुसार अभ्यासमंडळांसाठी असलेली पात्रता अनेक प्राध्यापकांकडे नसल्याचा फटका बसतो आहे. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार निवडला जाणारा अध्यक्ष पदव्युत्तर शिक्षक म्हणून १० वर्षांचा अनुभव, त्याच्याद्वारे दोन विद्यार्थ्यांना पीएच.डी.चे मार्गदर्शन आणि तीन संशोधन पुस्तक प्रकाशित करणे आदी निकषांचा समावेश आहे. शिवाय विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयातही १० वर्षे अनुभव आणि इतर निकषांची पूर्तता करणारे प्राध्यापक बरेच कमी आहेत. त्यामुळे २२ अभ्यासमंडळावर एकही सदस्य नेमता येणे अशक्य झाले. त्यामुळे या मंडळावरील अध्यक्षपद रिक्त राहणार आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ