शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टात नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूंची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:54 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्राचार्य नियुक्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची खरडपट्टी काढली.

ठळक मुद्देप्राचार्य नियुक्तीचे प्रकरणचुकीची गंभीर दखल घेण्याची तंबी

आॅनलाईन लोकमतनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्राचार्य नियुक्तीसंदर्भातील प्रकरणामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची खरडपट्टी काढली.डॉ. येवले यांचा प्राचार्य नियुक्तीचा अवैध आदेश रद्द करण्यात आला व भविष्यात असे चुकीचे आदेश जारी केल्यास गंभीर दखल घेण्यात येईल अशी तंबी त्यांना देण्यात आली. तसेच, आवश्यकतेनुसार त्यांना प्र-कुलगुरू म्हणून कार्य करण्यास मज्जाव करणारे निर्देशही दिल्या जातील असे न्यायालयाने बजावले.हे प्रकरण वर्धा येथील स्वावलंबी शिक्षण महाविद्यालय ( डी.एड.)शी संबंधित आहे. व्यवस्थापनाने महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्याचे पद भरण्यासाठी आवश्यक पात्रता असलेले डॉ. दीपक पुनसे यांचे नाव विद्यापीठाकडे पाठविले होते. परंतु, विद्यापीठाने सेवाज्येष्ठतेच्या आधारावर महाविद्यालयातील ग्रंथपालाची कार्यकारी प्राचार्यपदी नियुक्ती केली. डॉ. येवले यांनी २७ सप्टेंबर २०१७ रोजी यासंदर्भात आदेश जारी केला. त्याविरुद्ध डॉ. पुनसे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.२०१० मधील यूजीसी अधिसूचनेनुसार, डी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्यपदाकरिता एम.एड. व पीएच.डी. पदवी आवश्यक आहे. शिक्षण सहसंचालकांनीदेखील न्यायालयात ही बाब मान्य केली. परिणामी न्यायालयाने विद्यापीठाचा बचाव निरर्थक ठरवून डॉ. येवले यांचा वादग्रस्त आदेश रद्द केला व डॉ. पुनसे यांची कार्यकारी प्राचार्यपदी नियुक्ती करण्याचा आदेश दिला. पुनसे यांच्यातर्फे अ‍ॅड. भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.

 

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूर