शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नागपूर विद्यापीठाचा प्रताप : विद्यार्थ्यांना बंद झालेल्या अभ्यासक्रमाच्या पदव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 21:47 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर जनसंवाद (एमएमसी) अभ्यासक्रम २००९ मध्ये बंद करण्यात आला आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या जात आहेत. पदवीमध्ये हा अभ्यासक्रम कोणत्या विद्याशाखेंतर्गत येतो हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.

ठळक मुद्दे२००९ मध्ये बंद झाला एमएमसी अभ्यासक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्तर जनसंवाद (एमएमसी) अभ्यासक्रम २००९ मध्ये बंद करण्यात आला आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या पदव्या दिल्या जात आहेत. पदवीमध्ये हा अभ्यासक्रम कोणत्या विद्याशाखेंतर्गत येतो हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, २०१५ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘एम.ए. इन कम्युनिकेशन’ची पदवी देण्यात आली असून २०१६ व २०१७ मध्ये परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मात्र ‘एमएमसी’ची पदवी देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमाला २०१६ मधील पदवीत ‘सोशल सायन्स’चा तर, २०१७ मधील पदवीत ‘इंटरडिसिप्लिनरी’ विद्याशाखेचा भाग दाखविण्यात आले आहे. तसेच, सर्व पदव्यांमध्ये ‘ग्रेड’ ऐवजी ‘सीजीपीए’चा उल्लेख करण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, परीक्षा व विद्या विभाग याबाबत अनभिज्ञ आहे.यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अनिल हिरेखण यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. विद्याशाखेद्वारे पाठविण्यात येणाऱ्या माहितीच्या आधारावर पदव्या तयार केल्या जातात. अशा परिस्थितीत डॉ. हिरेखण यांच्या उत्तराने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.२०१८ मध्येही एमएमसी पदवीसूत्रांच्या माहितीनुसार, २०१८ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्याही एमएमसी अभ्यासक्रमाच्या पदव्या तयार करण्यात आल्या आहेत. या पदव्या अद्याप वाटप करण्यात आल्या नाहीत.चौकशी केली जाईलप्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याविषयी काहीच माहिती नसल्याचे सांगितले. तसेच, प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच योग्य माहिती दिली जाऊ शकते असे स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ