शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाचे वरातीमागून घोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 01:13 IST

ऐन प्रवेशप्रक्रियेच्या अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. अनेक महाविद्यालयांमधील प्रवेश जवळपास होत आले असताना विद्यापीठ प्रशासनाला उशिरा शहाणपण सुचले आहे. संबंधित यादीत सात महाविद्यालयांची नावे अनावधानाने प्रकाशित केल्याचा साक्षात्कार विद्यापीठाला आता झाला असून प्रवेशबंदीच्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात आली आहे. मात्र प्रवेशप्रक्रिया आटोपत आली असताना विद्यापीठाला उशिरा आलेली ही जाग नेमकी कशामुळे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाची चूक, फटका महाविद्यालयांना : प्रवेशप्रक्रिया आटोपत असताना मागे घेतली प्रवेशबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऐन प्रवेशप्रक्रियेच्या अगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने २५३ महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लावली होती. अनेक महाविद्यालयांमधील प्रवेश जवळपास होत आले असताना विद्यापीठ प्रशासनाला उशिरा शहाणपण सुचले आहे. संबंधित यादीत सात महाविद्यालयांची नावे अनावधानाने प्रकाशित केल्याचा साक्षात्कार विद्यापीठाला आता झाला असून प्रवेशबंदीच्या यादीतून त्यांची नावे वगळण्यात आली आहे. मात्र प्रवेशप्रक्रिया आटोपत आली असताना विद्यापीठाला उशिरा आलेली ही जाग नेमकी कशामुळे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठात ६०१ संलग्नित महाविद्यालये आहेत. यातील १२६ महाविद्यालयांमध्ये आवश्यक नियमित शिक्षक, कर्मचारी व सोईसुविधा नसल्यामुळे त्यांचे प्रथम वर्षाचे प्रवेश गोठविण्यात आले. याशिवाय अगोदर विद्यापीठाने निरंतर संलग्नीकरणासाठी अर्ज न करणाऱ्या ९८ तर ‘एलईसी’ची प्रक्रिया न पाळणाºया २९ महाविद्यालयांमधील प्रवेश गोठविले होते. एकूण २५३ महाविद्यालयांमध्ये प्रवेशबंदी लागू करण्यात आली होती. ३१ मे व २ जून रोजी ही प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली. मात्र नागपूर विद्यापीठाने ४ जुलै रोजी नवीन परिपत्रक जारी केले. यात सात महाविद्यालयांची नावे देण्यात आली असून या महाविद्यालयात नियमित शिक्षक असतानादेखील अनावधानाने त्यांची नावे यादीत समाविष्ट झाली होती, असे कारण विद्यापीठाने दिले आहे. या महाविद्यालयांना विद्यापीठाचे संलग्नीकरण असून येथे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.इतका उशीर का ?२ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये या महाविद्यालयांची नावे होती. त्यानंतर जवळपास महिनाभराने विद्यापीठाने आपली चूक सुधारण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. यासाठी एक महिन्याहून अधिक कालावधी का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कालावधीत महाविद्यालयांनीदेखील एकदाही आवाज उचलला का नाही, हेदेखील एक कोडेच आहे. दरम्यान, चूक करणाºया संबंधितांवर काही कारवाई होणार की नाही, हे विद्यापीठाने स्पष्ट केलेले नाही.ही आहेत महाविद्यालये-एसएफएस महाविद्यालय (बीकॉम-कॉम्प्युटर अप्लिकेशन)-श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालय (एमए-हिंदी)-मातृसेवा संघ समाजकार्य महिला महाविद्यालय (एमफिल-सोशल वर्क)-वायसीसीई (एमटेक-इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग)-लोक महाविद्यालय, वर्धा (बीकॉम)-न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅन्ड सायन्स कॉलेज, वर्धा (एमए- इंग्रजी व समाजशास्त्र)-बॅरि.शेषराव वानखेडे कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहपा (एमए-मराठी)

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर