शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नागपूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प ५०० कोटींचा, काम कवडीचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 11:51 IST

नागपूर विद्यापीठ केवळ अर्थसंकल्पाच्या नावाखाली आकड्यांची हेराफेरी करत आहे का व निधी नेमका खर्च होतो तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाच्या वित्त समितीने तयार केला अर्थसंकल्पमागील वर्षी ३५० कोटींचा होता अर्थसंकल्प

आशिष दुबे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदादेखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा अर्थसंकल्प वाढला आहे. २०१८-१९ साठी वित्त व लेखा समितीने एकूण ५०० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला आहे. मागील वर्षी हाच आकडा ३५० कोटी इतका होता. मात्र तरीदेखील विद्यापीठात कुठेही विकास दिसून येत नाही. विद्यापीठ केवळ अर्थसंकल्पाच्या नावाखाली आकड्यांची हेराफेरी करत आहे का व निधी नेमका खर्च होतो तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विद्यापीठाचा शैक्षणिक परिसर, ग्रंथालय, प्रशासकीय परिसर, परीक्षा भवन यांच्यासोबतच संचालित महाविद्यालयांची स्थिती वाईट आहे. मागील वर्षी १८ मार्च रोजी विधीसभेत विद्यापीठाचा ३६८ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. यात शैक्षणिक विभागातील इमारती, स्वच्छतागृह, वसतिगृह यांच्या डागडुजीसाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती तर सांस्कृतिक भवनासाठी ५ कोटी, ‘सेंटर फॉर सेरिकल्चर’साठी दीड कोटी, विद्यार्थी भवन, विद्यार्थी प्रशिक्षण केंद्रासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. विद्यापीठाच्या मुख्य ग्रंथालयासाठीदेखील १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र १० महिने उलटून गेल्यावरदेखील यातील एकही रुपया खर्च झालेला नाही.सर्वत्र सुविधांच्या नावावर बोंब असताना अर्थसंकल्पातील निधी नेमका खर्च होतो तरी कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.विद्यार्थिनींच्या सुरक्षेची व्यवस्था नाहीविद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात मागील अर्थसंकल्पात दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात यासाठी कुठलेही पाऊल उचलण्यात आलेले नाही. विद्यापीठात विद्यार्थिनींसाठी तक्रार केंद्रदेखील बनविण्यात आलेले नाही. शिवाय विद्यापीठात महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्तीदेखील झालेली नाही.परीक्षा भवनात स्वच्छतागृहच नाहीपरीक्षा भवनासाठी दरवर्षी कोट्यवधींची तरतूद असते. मागील वर्षी हा आकडा दोन कोटींचा होता. मात्र तेथे जाणारे शिक्षक, विद्यार्थी, महाविद्यालयांच्या प्रतिनिधींना स्वच्छतागृह शोधावे लागते, अशी स्थिती आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ