शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 21:56 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र व रसायनशास्त्र अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाची याचिका : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र व रसायनशास्त्र अभ्यास मंडळ निवडणुकीतील वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे देण्यात आलेल्या निर्णयाविरुद्ध विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.२३ नोव्हेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने वाडी येथील जवाहरलाल नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. मनीषा भातकुलकर व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. नितीन कोंगरे यांचा मतदार यादीत समावेश करण्याचा निर्णय दिला होता. हा निर्णय देताना नागपूर विद्यापीठाचे सर्व वादग्रस्त आदेश रद्द करण्यात आले होते. त्यावर नागपूर विद्यापीठाचा आक्षेप आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय अवैध असून तो निर्णय रद्द करण्यात यावा, अशी विनंती विद्यापीठाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.निवडणुकीच्या मतदार यादीसाठी महाविद्यालयाने डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांची नावे विद्यापीठाकडे पाठविली होती. त्यावर महाविद्यालयातील प्रा. आर. के. वानारे व प्रा. ए. यू. देवरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप मंजूर करून डॉ. भातकुलकर यांच्याऐवजी प्रा. देवरे तर, डॉ. कोंगरे यांच्याऐवजी प्रा. वानारे यांचा मतदार यादीत समावेश केला. त्याविरुद्ध डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांनी कुलगुरूंकडे अपील केले होते. कुलगुरूंनी त्यांचे अपील खारीज करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचा निर्णय कायम ठेवला. परिणामी, त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांची याचिका मंजूर करून निवडणूक निर्णय अधिकारी व कुलगुरू यांचे वादग्रस्त आदेश रद्द केले आणि डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांचा मतदार यादीत समावेश करण्याचे निर्देश दिले.कोंगरे, भातकुलकरांना नोटीससर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी विद्यापीठाच्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर डॉ. कोंगरे व डॉ. भातकुलकर यांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला आहे. विद्यापीठातर्फे अ‍ॅड. सुधीर वोडितेल यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ