शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : तीनच वर्षांत फेरमूल्यांकनाच्या अर्जांत तिपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 21:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनाला मागील काही वर्षांपासून वेग आला आहे. निकाल लवकर घोषित होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांकनासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देअर्जांच्या माध्यमातून कोट्यवधींचा महसूल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मूल्यांकनाला मागील काही वर्षांपासून वेग आला आहे. निकाल लवकर घोषित होत असले तरी विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांकनासंदर्भात प्रश्नदेखील उपस्थित होत आहे. संबंधित प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे मागील काही कालावधीपासून फेरमूल्यांकनासाठी येणाऱ्या अर्जांमध्ये सातत्याने वाढ होते आहे. २०१६ च्या उन्हाळी परीक्षांच्या तुलनेत २०१९ च्या उन्हाळी परीक्षांच्या निकालानंतर फेरमूल्यांकनासाठीच्या अर्जांमध्ये तब्बल ३०९ टक्के म्हणजेच तिपटीने वाढ झाली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर विद्यापीठाकडे विचारणा केली होती. १ जानेवारी २०१६ ते ३१ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत विद्यापीठाकडे फेरमूल्यांकनासाठी किती अर्ज आले, यातील किती अर्ज नाकारण्यात आले, फेरमूल्यांकनासाठीच्या अर्जांतून किती महसूल प्राप्त झाला, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. विद्यापीठाच्या फेरमूल्यांकन कक्षाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, २०१६ च्या उन्हाळी परीक्षेत विद्यापीठाकडे फेरमूल्यांकनासाठी ११ हजार ११६ अर्ज आले होते. त्यानंतर प्रत्येक परीक्षेत अर्जांची संख्या वाढत गेली. २०१६ च्या हिवाळी परीक्षेत २० हजार ८५८, उन्हाळी-२०१७ मध्ये २३ हजार ७७४, हिवाळी-२०१७ मध्ये २९ हजार ५४४, उन्हाळी-२०१८ मध्ये ३८ हजार ९९६ तर हिवाळी-२०१८ मध्ये ४५ हजार १५९ अर्ज आले. २०१९ च्या उन्हाळी परीक्षांच्या निकालानंतर फेरमूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांचा आकडा ४५ हजार ५०० इतका होता. उन्हाळी-२०१६ च्या तुलनेत उन्हाळी-२०१९ मध्ये फेरमूल्यांकनाच्या अर्जांमध्ये तब्बल ३४ हजार ३८४ म्हणजेच ३०९.३२ टक्क्यांनी वाढ झाली.तीन कोटींहून अधिकचा महसूल२०१६-१७ ते २०१८-१९ या कालावधीत विद्यापीठाला फेरमूल्यांकनाच्या माध्यमातून तीन कोटींहून अधिकचा महसूल प्राप्त झाला. २०१६-१७ मध्ये ४७ लाख ६६ हजार ४०४, २०१७-१८ मध्ये १ कोटी १५ लाख ५३ हजार ६५७ तर २०१८-१९ मध्ये १ कोटी ६६ लाख ९२ हजार ७३७ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. तीनच वर्षांत महसुलामध्ये १ कोटी १९ लाख २६ हजार ३३३ रुपयांची वाढ झाली. टक्केवारीतील वाढ २५०.२२ टक्के इतकी ठरली.फेरमूल्यांकनाचे परीक्षानिहाय अर्जपरीक्षा                     अर्जउन्हाळी-२०१६        ११,११६हिवाळी-२०१६         २०,८५८उन्हाळी-२०१७        २३,७७४हिवाळी-२०१७        २९,५४४उन्हाळी-२०१८        ३८,९९६हिवाळी-२०१८        ४५,१५९उन्हाळी-२०१९        ४५,५००

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता