शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

नागपूर विद्यापीठ : विद्यार्थ्यांना परीक्षा वेळापत्रकाची 'एसएमएस'द्वारे मिळणार माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 20:51 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देणारा प्रस्ताव विधीसभेने संमत केला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेचे वेळापत्रक व निकालांची सूचना थेट मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’च्या माध्यमातून मिळणार आहे.

ठळक मुद्देचार जिल्ह्यातील चार लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देणारा प्रस्ताव विधीसभेने संमत केला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेचे वेळापत्रक व निकालांची सूचना थेट मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’च्या माध्यमातून मिळणार आहे. विधीसभेत यासंदर्भात प्रवीण उदापुरे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. यामुळे नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा मिळणार आहे.नागपूर विद्यापीठातर्फे परीक्षेचे वेळापत्रक तसेच निकाल संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतात. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी नियमितपणे संकेतस्थळ पाहू शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा त्यांना उशिरा माहिती मिळते. शिवाय निकाल आल्यानंतर फेरमूल्यांकनाच्या अर्जासाठी फारच कमी दिवसांचीच मुदत असते. निकालाची माहितीच उशिरा मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना वेळेत फेरमूल्यांकनासाठी अर्ज करता येत नाही. महाविद्यालयांकडूनदेखील त्यांना मुदतीत माहिती दिली जात नाही. दुसरीकडे निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील परीक्षेचा अर्ज भरावा लागतो. तो अर्ज भरायला उशीर झाला तर विलंब शुल्क द्यावे लागते व त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो.हीच बाब लक्षात घेऊन प्रवीण उदापुरे यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षांचे वेळापत्रक व निकाल यांची सूचना ‘एसएमएस’द्वारे देण्यासंदर्भातील प्रस्ताव विधीसभेच्या बैठकीत मांडला. विधीसभेने या प्रस्तावाला मंजुरी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षाsmsएसएमएस