लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या दुसऱ्या दिवशीदेखील तांत्रिक अडचणींचा घोळ कायम राहिला. विद्यापीठाने ओटीपी प्रणाली बंद केल्यानंतरदेखील अनेकांच्या मोबाईल अॅपमध्ये प्रश्नपत्रिका उघडलीच नाही. ‘समथिंग वेंट रॉंग’ असेच अनेक विद्यार्थ्यांना संदेश येत होते. त्यामुळे अनेकांना नियोजित वेळेत परीक्षा देता आली नाही. दरम्यान, ज्यांना परीक्षा देता आली नाही त्यांची लवकरच फेरपरीक्षा घेण्यात येईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.शुक्रवारी सकाळच्या सत्रात जास्त समस्या जाणवली नाही. मात्र नंतरच्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढली व अनेकांच्या अॅपवर प्रश्नपत्रिकाच उघडली नाही. बराच वेळ प्रयत्न करुनदेखील त्यांना यश आले नाही. त्यामुळे आता फेरपरीक्षा घ्यावी अशी विद्यार्थी व पालकांकडून मागणी होत आहे. परीक्षेच्या पहिल्या दिवशी १८ टक्के विद्यार्थ्यांना पेपर देता आले नव्हते.दरम्यान, इतर विद्यापीठांच्या तुलनेत नागपूर विद्यापीठाची कामगिरी चांगली राहिली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना पेपर देता आले नाही त्यांची फेरपरीक्षा लवकरच होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी तणावात : दुसऱ्या दिवशीदेखील तांत्रिक समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 19:28 IST
Nagpur University, Online Exam, Confuion, Nagpur Newsराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या दुसऱ्या दिवशीदेखील तांत्रिक अडचणींचा घोळ कायम राहिला. विद्यापीठाने ओटीपी प्रणाली बंद केल्यानंतरदेखील अनेकांच्या मोबाईल अॅपमध्ये प्रश्नपत्रिका उघडलीच नाही.
नागपूर विद्यापीठातील विद्यार्थी तणावात : दुसऱ्या दिवशीदेखील तांत्रिक समस्या
ठळक मुद्देसंधी हुकलेल्यांची फेरपरीक्षा होणार