शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ :१०० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:36 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे १०० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देमूल्यांकनात वेळकाढूपणा भोवला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या निकालांची गती यंदादेखील कायम असली तरी वाणिज्य शाखेच्या निकालांना काहिसा उशीर झाला आहे. परीक्षा विभागाने ही बाब गंभीरतेने घेतली असून मूल्यांकनात वेळकाढूपणा करणाऱ्या सुमारे १०० हून अधिक प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांच्या ९३५ पैकी जवळपास ६२७ निकाल जाहीर झाले आहेत. हे निकाल ३० दिवसाच्या आत जाहीर झाले आहेत. मागील सत्रांप्रमाणे यंदादेखील मूल्यांकनाचा वेग कायम आहे. परंतु वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेत येणाऱ्या ‘बीकॉम’च्या निकालांना काहिसा उशीर झाला आहे. ‘बीकॉम’चे एक, तीन व पाच या सत्रांचे निकाल लांबले आहेत. इंग्रजी व वाणिज्य विषयाचे काही प्राध्यापक मूल्यांकनाला नियमित येतच नव्हते अशी बाब परीक्षा विभागाला आढळून आली. या सर्वांना प्रक्रियेप्रमाणे मूल्यांकनाचे पत्र गेले होते. परंतु तरीदेखील मूल्यांकनात त्यांनी हलगर्जीपणा दाखविला आहे. परीक्षेच्या कामाला गंभीरतेने न घेणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश २०१८ सालच्या ‘जेबीव्हीसी’ तसेच पुणे येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आले होते. यानुसार ही कारवाई झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासंदर्भात माध्यम समन्वयक डॉ.श्याम धोंड यांना संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.मूल्यांकनाला न येणे ही गंभीर बाब : प्रफुल्ल साबळेयासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता इंग्रजी विषयाच्या ८८ व वाणिज्यच्या ३० प्राध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित नोटीस ही नवीन विद्यापीठ कायद्यानुसार देण्यात आली आहे. त्यांना यासंबंधातील पत्र लवकरच मिळतील, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या मूल्यांकनाचा वेग चांगला आहे. परंतु काही प्राध्यापकांमुळे जर त्यात खीळ बसत असेल तर ती गंभीर बाब आहे व म्हणूनच कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठProfessorप्राध्यापक